एका फोन कॉल ने बदलले अजय देवगन आणि अक्षय कुमार दोघांचेही आयुष्य! काय आहे या कॉलचे रहस्य जाणून घ्या

एका फोन कॉल ने बदलले अजय देवगन आणि अक्षय कुमार दोघांचेही आयुष्य! काय आहे या कॉलचे रहस्य जाणून घ्या

अक्षय कुमार म्हणजे ॲक्शन हिरो म्हणून आपल्यासमोर कायम आला आहे. त्याने इंडस्ट्रीमध्ये तब्बल तीस वर्ष सलग काम केले आहे. आज अशी परिस्थिती आहे की, डायरेक्‍टर आणि प्रोड्यूसर त्याच्या घराबाहेर रांगा लावून उभे असतात. त्याच्या सोबत एकदा काम करण्यासाठी सहकलाकार मरमर करतात. मात्र, याच अक्षयकुमारला सुरुवातीच्या काळामध्ये प्रचंड संघर्षाला सामोरे जावे लागले. तुम्हाला अक्षय कुमार आणि अजय देवगन च्या बाबतीत एक साम्य असणारा किस्सा आज आम्ही सांगणार आहोत.

या किस्यात त्या कॉल ची कहाणी आहे, ज्यात एका फोन कॉल ने दोघांचेही आयुष्य बदलून टाकले होते. नेमका फोन कॉल कशासाठी होता? आणि काय झाले असे की, दोघांचे आयुष्य बदलले? चला तर मग जाणून घेऊया!

आपण सगळेच जाणतो की, 1991 मध्ये अक्षय कुमारचा डेब्यू सौगंध या सिनेमातून झाला. या सिनेमातून त्याने पदार्पण केले खरे परंतु, त्याला हवे तसे यश मिळाले नाही आणि हा सिनेमा एवढा गाजला ही नाही. यानंतर त्याला चित्रपट मिळण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. मात्र, अक्षय कुमार ला तो फोन कॉल आला नसता तर, त्याची डेब्यू फिल्म सुद्धा वेगळी असती, आणि त्याचा बॉलिवूडमधला प्रवासही थोडा सुखकर झाला असता.

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, अक्षय कुमार फुल और कांटे या चित्रपटांमधून पदार्पण करणार होता. होय! हा चित्रपट अजय देवगन चा पहिला चित्रपट आहे. आश्चर्याची बाब तर पुढेच आहे… या चित्रपटासाठी फोटोशूट आणि पोस्टर चे शूटिंग देखील झालेले होते. त्याचबरोबर चित्रपटाशी संबंधित अनेक कार्यक्रमांना देखील अक्षय कुमारचा हजेरी लावत होता. म्हणजे, जवळजवळ अक्षय कुमारने हा चित्रपट साईन केला होता असे म्हणा!

म्युझिक साठी सुद्धा अक्षय कुमार मेहनत घेत होता. हा चित्रपट पडद्यावर चांगला चालला तर, अक्षय कुमारला याची जाणीव होती की त्याचे करिअर बॉलिवूडमध्ये सेट होणार आहे. हातातोंडाशी आलेला घास अचानक हिरावला जाईल हा विचारही त्यांनी कधी केला नसेल. मात्र, एक दिवस रात्री त्याला एक कॉल आला आणि त्या कॉल मध्ये असे सांगण्यात आले की, “उद्यापासून शूटिंगला नाही आलास तरी चालेल!” या कॉलनी त्याचे आयुष्य खरंच बदलले होते. त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती. नेमके काय झाले? कसे झाले? त्याला काही कळायच्या आतच गोष्टी घडत गेल्या. त्यानंतर त्याला कळाले की, त्याच्या जागी अजय देवगनला घेतले गेले आहे.

अजय देवगन ने सुद्धा या चित्रपटात स्वतःची एक्टिंग आणि फायटिंग स्किल्स दाखवून खरंच नाव कमावले! तो चित्रपटही खूप गाजला. मात्र, अक्षय कुमारच्या वाट्याला येणारा ब्लॉकबस्टर चित्रपट अजय देवगन ला मिळाला आणि त्याचा परिणाम अक्षय कुमारच्या आयुष्यावर झाला हे मात्र निश्चित! त्यानंतर त्याला ऑफर मिळण्यासाठी थोडा त्रास झाला. एका मागे एक बरेच फ्लॉप चित्रपट त्याने दिले. कारण, त्याची सुरूवात सौगंध सारख्या एका चित्रपटाने झाली होती.

1994 पासून अक्षय कुमारचे नशीबच पालटले. एकामागे एक प्लॉट ठरणारे चित्रपट आणि कमी मिळणाऱ्या ऑफर्स बंद झाल्या, आणि त्याच्या नावे चांगले चित्रपट येऊ लागले. 1991 ते 2000 या 9-10 वर्षाच्या काळात त्याने तब्बल 42 चित्रपट केले त्यातून बारा सुपरडुपरहिट होते.

वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त कोणालाही मिळत नाही हे या उदाहरणातून आपल्याला निश्चितच कळते. मात्र, मेहनत करून आपण आपले नशीब पालटवण्याचा प्रयत्न करू शकतो आणि ती वेळ लवकर येईल यासाठी कष्ट घेऊ शकतो हे ही तेवढेच खरे!

Being Marathi

Related articles