औरंगाबादच्या तरुणाची पोलीस कोठडी आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांचा काय आहे संबंध? जाणून घ्या!

औरंगाबादच्या तरुणाची पोलीस कोठडी आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांचा काय आहे संबंध? जाणून घ्या!

औरंगाबादच्या तरुणाची पोलीस कोठडी आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांचा काय आहे संबंध? जाणून घ्या!

बॉलीवुड सितारे आणि त्यांच्या वैयक्तिक गोष्टी यांची चर्चा सगळीकडे होत असते. पूर्वीच्या काळी हीच चर्चा वाचण्यासाठी लोक मॅगझिन विकत घेत. आता मात्र, सोशल मीडियामुळे ही सेलिब्रिटी आणि लोकांमधील दरी कमी झाली आहे. सेलिब्रिटी आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट त्यांच्या चाहत्यांना दाखवू शकतात. त्यांची जीवनशैली, त्यांचे घर इतकेच नाही तर सोशल मीडियामुळे त्यांचे विचार देखील ते ज्या वेगाने करतात त्याच वेगात ते लोकांपर्यंत पोहचतात. याचा फायदा जितका आहे, तितकाच याचा तोटा देखील आहे.

सुशांत सिंह राजपूत याच्या अचानक या जगातून जाण्याने, बॉलीवुडमध्ये नेपोटीजमचा वाद पुन्हा उफाळून वर आलेला आहे. यात स्टार किड्स आणि अनेक वर्ष बॉलीवुडमध्ये राज्य करणारे लोक यांना लोकांकडून चांगलाच फटका बसताना पाहायला मिळतोय. सुशांतच्या अशा अंताला ‘त्याने स्वतः आयुष्य संपवले असे म्हटल्याने अनेक सेलिब्रिटी चाहत्यांच्या रोषाला सामोरे गेले आहेत.

सोनाक्षीचे देखील तेच झाले. तिचे ट्विटस आणि तिच्या इन्स्टा पोस्ट्स या सुशंतचा अंत ही हत्या नसून त्याने स्वतःच आयुष्य संपवले आहे हे दर्शविणाऱ्या होत्या. त्याचबरोबर, लोक मागे राहिलेल्या लोकांना कसे जबाबदार ठवतात आणि ते कसं चूक आहे हे त्यातून तिने बोलले होते. याचं रुपांतर सोशल मीडिया वादावर झाले. ती एक स्टार कीड आहे म्हणून तिला याचा सामना करावा लागला.

आधी करण जोहर प्रमाणे तिने काही दिवस सोशल मिडीयाला राम राम ठोकला. मात्र, नंतर तिने याविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली. लोकांच्या रागाच्या भरात येणाऱ्या कमेंट्स आणि अर्वाच्य भाषा याला अनेकदा सेलिब्रिटी दुर्लक्षित करतात. मात्र, तिने ७ ऑगस्ट २०२० रोजी सायबर क्राईम अंतर्गत अशा व्यक्ती विरोधात तक्रार नोंद केली.

आय पी सी २९४ आणि ३५४ अंतर्गत महिलांचे होणारे सायबर बुलींग याविरोधात तक्रार नोंदविण्यात आलेली आहे. हा तरुण औरंगाबादचा आहे आणि त्याने तिला अर्वाच्य भाषेचा वापर करून कमेंट केली होती. त्याच्या आय पी अ‍ॅड्रेस वरुन त्याला पोलिसांनी शोधून कोठडी केलेली आहे.

Being Marathi

Related articles