अबब! मानधनाच्या बाबतीत अक्षयने फोर्ब्सच्या यादीत टॉप-10 मध्ये मिळवले स्थान. जाणून घ्या टॉप-10 लिस्ट.

अबब! मानधनाच्या बाबतीत अक्षयने फोर्ब्सच्या यादीत टॉप-10 मध्ये मिळवले स्थान. जाणून घ्या टॉप-10 लिस्ट.
अभिनेता अक्षय कुमार हा नेहमीच त्याचे चित्रपट आणि त्याच्या दातृत्वामुळे चर्चेत असतो. एकतर वर्षभरात त्याचे येणारे सर्वाधिक चित्रपट आणि दुसरीकडे सामाजिक कार्यासाठी तो करत असलेला दान धर्म यामुळे अक्षय नेहमी चर्चेत राहतो. मात्र सध्या अक्षय एका वेगळ्याच कारणामुळे भारतातच नव्हे तर जगभरामध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
बॉलिवुइड सेलिब्रेटी चित्रपटासाठी तगडे मानधन घेतात हे आपण जाणतोच. हॉलिवूडमध्ये तर याहून अधिक मानधन घेणारे अभिनेते आहेत. मात्र सर्वाधिक मानधन घेणाऱ्या जगातील टॉप-10 अभिनेत्यांमध्ये भारतीय अभिनेता अक्षय कुमारचा समावेश झाला आहे.
अमेरिकन मॅगझीन फोर्ब्सने यावर्षी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या जगातील 10 अभिनेत्यांची यादी नुकतीच जाहीर केली असून त्यामध्ये अभिनेता अक्षय कुमार हा सहाव्या स्थानी आहे. विशेष म्हणजे अक्षयने जगप्रसिद्ध अभिनेता जॅकी चेन ला देखील मागे टाकत सहावे स्थान मिळवले आहे.
अक्षयचा मुख्य आर्थिक स्रोत हा त्याचे चित्रपट तसेच तो करत असलेल्या जाहिराती आहेत. याव्यतिरिक्त तो अनेक ब्रॅंड्सचा ब्रँड अँबेसिडरदेखील आहे. यातूनदेखील त्याला चांगली कमाई मिळते. त्याचप्रमाणे अक्षयची स्वतःची चित्रपटनिर्मिती कंपनीदेखील असून याद्वारे निर्माण केलेल्या चित्रपटांमधूनदेखील त्याला करोडोंचे उत्पन्न मिळते.
सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांची फोर्ब्सची टॉप-10 यादी :
▪️ ड्वेन जॉनसन : 87.5 मिलियन डॉलर
▪️ रयान रेनॉल्ड्स : 71.5 मिलियन डॉलर
▪️ मार्क व्हालबर्ग : 58 मिलियन डॉलर
▪️ बैन एफ्लेक : 55 मिलियन डॉलर
▪️ विन डीजल : 54 मिलियन डॉलर
▪️ अक्षय कुमार : 48.5 मिलियन डॉलर
▪️ मैनुएल मिरांडा : 45.5 मिलियन डॉलर
▪️ विल स्मिथ : 44.5 मिलियन डॉलर
▪️ एडम सैंडलर : 41 मिलियन डॉलर
▪️ जैकी चेन : 40 मिलियन डॉलर