एके काळी 15 सेकंदाचा रोल मिळावा म्हणून केली होती प्रयत्नांची शर्थ! आज आहे बॉलीवुड मधील दमदार अभिनेता

एके काळी 15 सेकंदाचा रोल मिळावा म्हणून केली होती प्रयत्नांची शर्थ! आज आहे बॉलीवुड मधील दमदार अभिनेता

एके काळी 15 सेकंदाचा रोल मिळावा म्हणून केली होती प्रयत्नांची शर्थ! आज आहे बॉलीवुड मधील दमदार अभिनेता

आयुष्यात क्षणिक सुखापासून दूर जाऊन आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत जो जगतो तोच यशाची शिखरे गाठतो. बुधाना, उत्तरप्रदेश मधील जन्म, उत्तराखंडमध्ये लहानपण आणि प्राथमिक शिक्षण आणि नंतर हरिद्वारमध्ये बॅचलर ऑफ केमिस्ट्री ही पदवी मिळवून, केमिस्ट म्हणून 1 वर्ष उत्तराखंडमध्ये नोकरी, त्यानंतर दिल्लीमध्ये नव्या कामाच्या शोधात निघून अचानक एक नाटक पाहून अभिनयाची उजळणी करून नवी शिखरे गाठणे हे कोणत्याही अभिनेत्याची मेहनत आणि सातत्य याचे प्रमाण आहे.

हे वर्णन आहे आजच्या अभिनयाच्या परमोच्च शिखरावर असलेल्या नवाजुद्दीन याचे. ८ भावंडात तो मोठा. नको नको त्या परिस्थितीतून जाताना अनेक वेळा गरिबीची चीड यायची. तरी देखील तो थकला नाही आणि थांबलासुद्धा नाही. आज इथपर्यंत पोहोचल्यावर सुद्धा हा 46 वर्षीय अभिनेता आपला संघर्ष एखाद्या मेडल प्रमाणे मिरवतो. हे केवळ आणि केवळ त्याच्या जमिनीशी तो प्रामाणिक आणि मूळ रोवून उभा आहे याचे द्योतक आहे.

सरफरोश हा चित्रपट अभिनेता आमिर खान आणि सोनालीच्या प्रेमपटापेक्षा देश भक्तिपर चित्रपट म्हणून नावाजला गेला. बीयर बारच्या बाहेर “आसमान मे टीनिनिन… लाखो तारे टीनिनिन” हे बोलणारा बेवडा आजही कोणालाही आठवून हसवून जातो. तो बेवडा म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी! १५ सेकंदाच्या रोलला सुध्दा किती संस्मरणीय करता येऊ शकते हे त्याने दाखवून दिले आहे. ‘गँग्स ऑफ वासेपुर’ या चित्रपटासाठी त्याने नॅशनल अवॉर्ड देखील मिळवला आहे. अनेक अवॉर्ड नंतर मिळाले परंतु नॅशनल अवॉर्ड मिळणे ही कलाकारासाठी महत्वाची बाब असते.

सॅकरेड गेम्स मधून त्याने डिजिटल माध्यमात किती नावीन्यपूर्ण प्रयोग करून ते अतिशय यशस्वी करता येऊ शकतात हे दाखवले आणि तो नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा विद्यार्थी आहे हे सिद्ध केले. “कभी कभी लगता हैं के आपूनीच भगवान है!” हा त्याचा डायलॉग तर लोकांनी डोक्यावर घेतला. त्याचे मिम झाले, टी शर्टवर हे डायलॉग झळकू लागले त्याने लोकांना वेड लावलं.

आलिया सिद्दीकी हिच्याशी लग्न करून त्याने मुंबईमध्ये संसार थाटला. लव्ह मॅरेज केले. अंजना पांडे आलिया सिद्दीकी झाली. एक मुलगा आणि एक मुलगी असताना काही दिवसापूर्वी आलियाने पत्रकारांना ती घटस्फोट घेऊ इच्छित आहे हे सांगितले. नवाज तरी देखील काही एक बोलला नाही. आरोप प्रत्यारोप यात तो अडकत नाही.

आपल्या संघर्ष आणि आयुष्याविषयी बोलताना एका मुलाखतीत तो म्हणाला, “कभी उदास होकर मैं घर फोन करता था। माँ को कहता था, कुछ भी नहीं बदल रहा। पैसे भी नहीं है। माँ कहती थी ‘बारा महीने में एक बार तो कचरे के ढेर की भी जगह बदलती है, तुम तो इन्सान हो, कैसे कुछ नहीं बदलता? बदलेगा, देख ले’… अच्छा लगता था। ठीक है कचरा हूं…लेकिन हूँ तो सही! सरफरोश में पंधरा सेकंद का रोल था मेरा। फिर मुन्नाभाई में पूरे दो मिनट का रोल मिल गया। अब सोचो, पंधरा सेकंद से दो मिनट तक का फासला तय करने के लिए मुझे तीन साल लग गए।” यातून जिद्दी आणि ध्येयनिष्ठ नवाज जेव्हा काही ठरवतो तेव्हा माणूस काहीही करू शकतो हेच आपल्याला दाखवून देतो.

Being Marathi

Related articles