नेपाळी प्रांतप्रधानाची नात आहे ‘बॉलीवूड’ मधील प्रसिद्ध ‘अभिनेत्री’, आता दिसतेय खूपच सुंदर, पहा फोटो..

मनीषा कोईराला ही ९० च्या दशकातील सुप्रसिद्ध आणि ब्लॉकबस्टर चित्रपट देणारी एक अभिनेत्री आहे. १६ ऑगस्ट १९७० मध्ये तिचा नेपाळी संस्कृतीत काठमांडू येथे जन्म झाला. तिचे आजोबा नेपाळचे दोनदा पंतप्रधान राहिलेले. बिश्र्वेश्र्वर प्रसाद कोईराला आणि वडील प्रकाश कोईराला हे नेपाळच्या सरकारमधील मंत्री होते. तिने मात्र, लहानपणीच डॉक्टर व्हायचे ठरवले होते.
मात्र, मॉडेलिंग करून तिला माहित नसताना अभिनय तिच्या आयुष्यात आला. आणि याच अभिनयाच्या जोरावर तिने भारतीय चित्रपट सृष्टीत नाव केले. तिचा जन्म नेपाळमध्ये झाला असला, तरी ती वाराणसी आणि दिल्लीमध्ये वाढली, शिकून मोठी झाली. ‘सौदागर’ चित्रपटात सुभाष घई यांनी तिला कास्ट केले. तिथून पुढे लज्जा, १९४२: ए लव्ह स्टोरी, मन, दिल से, बॉम्बे, अकेले हम अकेले तुम, गुप्त, कच्चे धागे असे एकाहून एक जबरदस्त सिनेमे तिने दिले.

१९ जून २०१० मध्ये वयाच्या ४० व्या वर्षी तिने नेपाळी बिझनेसमन तैकुन सोबत लग्न केले. आणि खूप चर्चांना उधाण आले. एक तर ४० व्या वर्षी लग्न आणि भारतात मोठी होऊन नाव कमवून नेपाळी माणसाशी लग्न! याने तिच्या चाहत्यांना तिने नाराज केले. २०१२ मध्ये बातम्या येऊ लागल्या की, तिने तिच्या नवऱ्याला घटस्फोट दिला आहे. यामुळे लोकांना नेमके कारण समजत नव्हते. एका मुलाखतीत तिनेच स्वतः मीच या घटस्फोटाला कारणीभूत आहे असे सांगितले.

घटस्फोट घेतल्यानंतर तिला त्रास जाणवू लागला. तिची तब्येत बिघडत गेली. आणि मग उपचार करताना तिला ओवरियन कॅन्सर आहे हे समोर आले. कॅन्सरशी जीवघेणी झुंज ती देत होती आणि ते ही एकटीच! जिद्दीने तिने त्यावर मात केली आणि आज पुन्हा बॉलीवुड मध्ये सक्रिय झाली. नव्या वेबसिरिज आणि चित्रपटात सध्या ती काम करते.

कलेचे इतर कंगोरे ती आजमावून पाहते. आयुष्य सोपं कोणासाठीच नसतं. अगदी कितीही श्रीमंत घरातील व्यक्तीसाठीसुद्धा! मात्र, जगण्याची जिद्द आणि लढण्याची ताकद तुम्हाला शक्तिशाली आणि यशस्वी व्यक्ती बनवते. हेच मनीषा कोईरालाकडे पाहून कळते.