रेखालासुद्धा करावे लागले होते ‘बी-ग्रेड’ सिनेमात काम? हे आहे कारण

रेखालासुद्धा करावे लागले होते ‘बी-ग्रेड’ सिनेमात काम? हे आहे कारण
बॉलीवूडच्या अनेक तारकांनी ‘बी-ग्रेड’ सिनेमात काम करत बोल्ड सीन दिलेले आपल्याला माहिती आहे. त्यांचे अनेक चित्रपटही सुपर-डुपर हिट ठरले आहेत. मनीषा कोइराला, नेहा धुपिया, अर्चना पुरण सिंह, पायल रोहातगी, ईशा कोप्पिकर, ममता कुलकर्णी या सारख्या अनेक तारकांनी आपल्या करिअर मध्ये बी-ग्रेड सिनेमांमध्ये काम केले आहे. मात्र आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्री विषयी सांगणार आहोत जिने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडवर अधिराज्य गाजवले असतानाही कामसूत्र सारख्या बी-ग्रेड सिनेमात काम केलंय.
चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री रेखा आजही तरुणांच्या हृदयाच्या कोपऱ्यात घर करून आहे. रेखाचं सौंदर्य आजही कमी झालेलं नाहीये. ६५ वर्षापेक्षा अधिक वय असलेली रेखा आजही इतर अभिनेत्रींना सौंदर्याच्या बाबतीत टक्कर देते. सत्तर, ऐंशी आणि नव्वदच्या दशकात रेखाने चित्रपटसृष्टीत अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर गाजवले. त्या काळात रेखा टॉप अभिनेत्री होती.
बॉलीवूडची टॉप अभिनेत्री असूनही रेखाने बी ग्रेड सिनेमांमध्ये काम केले. तमिळ सिनेमांमध्ये रेखाने अनेक बोल्ड सीन केले आहेत. याशिवाय तिच्या करिअरमध्ये रेखाने अनेक बी-ग्रेड सिनेमांमध्ये मादक दृश्य शूट केलेले आहेत.
रेखाने तिच्या सुरुवातीच्या काळात कामसूत्र नावाच्या बी-ग्रेड सिनेमामध्ये काम केले. रेखाचा हा सिनेमा खूप गाजला होता. त्यानंतर तिला हळु हळु इतर सिनेमांमध्ये अनेक भूमीका मिळत गेल्या.
अनेकवेळा असेही बोलले जाते की, रेखाची कौटुंबिक परिस्थिती हलाखीची होती, त्यामुळे रेखाने अत्यंत कमी वयातच काम करायला सुरुवात केली होती. परिणामी सुरुवातीच्या काळात रेखाला बी-ग्रेड सिनेमांमध्ये काम करावे लागले होते. रेखा अभिनयात निपुण आहे. कुठलीही भूमिका रेखा सहज निभावू शकत होती. आणि बी ग्रेड सिनेमामध्ये काम करून रेखाने ती सर्वसमावेशक भूमिका साकारू शकते हे सिद्द्ध झाले. या एव्हरग्रीन अभिनेत्रीला आजही अनेक सिनेमांमध्ये काम करण्याची ऑफर मिळते. रेखा तिच्या सर्वोत्कृष्ट अभिनय कलेने कायम चर्चेत राहिली आहे.