खिलाडी अक्षय कुमारला ‘या’ 53 वर्षांच्या अभिनेत्रीबरोबर करायचं होतं लग्न, पण…

खिलाडी अक्षय कुमारला ‘या’ 53 वर्षांच्या अभिनेत्रीबरोबर करायचं होतं लग्न, पण…

धक धक गर्ल माधुरी दीक्षितने चाहत्यांसोबत अनेक कलाकार आणि खेळाडूंच्या सुद्धा हृदयावर राज्य केले होते. आज सुद्धा अनेक कलाकार माधुरीच्या एका हास्यावर अक्षरशः जीव ओवाळून टाकतात.  माधुरी दीक्षित चे तिच्या पिढीतील अनेक कलाकारांसोबत नाव जोडले गेले होते यामध्ये अनिल कपूर पासून ते संजय दत्त पर्यंत अनेक कलाकार यांची नावे घेतली जातात.

मात्र या पैकी कोणत्याही कलाकारांसोबत विवाह न करता माधुरी दीक्षितने अमेरिकास्थित भारतीय वंशाचे डॉक्टर श्रीराम नेने यांच्या सोबत विवाह केला व चाहत्यांसोबत आणि कलाकारांच्या हृदयाचेही अक्षरशः तुकडे झाले .माधुरीचे नाव जोडल्या गेलेल्या कलाकारां पैकी एक म्हणजे खिलाडी कुमार अक्षय कुमार होय. त्याच्या काळातील अनेक अभिनेत्रींसोबत अक्षयचे प्रेमसंबंध होत

 अक्षय कुमार चे नाव त्यावेळेच्या आघाडीच्या अभिनेत्री रविना टंडन, पूजा बत्रा शिल्पा शेट्टी यांच्या सोबतच खुद्द रेखा यांच्यासोबत सुद्धा जोडले गेले होते. मात्र या सर्वांमध्ये खिलाडी अक्षय कुमारला मात्र माधुरी दीक्षित खूपच आवडायची व ते दोघे खूप चांगले मित्रही होते. या दोघांनी एकत्र केलेल्या आरजू या  चित्रपटादरम्यान त्यांच्यामधील जवळीक सुद्धा वाढली होती व प्रसारमाध्यमांमध्ये या दोघांचे अफेअरच्या चर्चा तिखट मीठ लावून रंगवल्या जात होत्या .

मात्र त्यावेळी अक्षय कुमार हा अगोदरच ट्विंकल खन्ना सोबत विवाह बंधनात अडकला होता. त्यामुळे माधुरी दीक्षितनेही काही काळानंतर अक्षयसोबत केवळ मैत्री पूर्ण संबंध ठेवण्याचा निर्णय घेतला. तिने विवाहानंतर सुद्धा अक्षय सोबत मैत्रीपूर्ण संबंध कायम ठेवले आहेत. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये तिने अक्षयच्या वैयक्तिक आयुष्यातील काही मजेशीर गोष्टी सांगितल्या ज्यामध्ये अक्षयला घड्याळांची खूप आवड असून तो त्याच्या मित्रांची आवडलेली घड्याळे त्यांच्या नकळत कशाप्रकारे हस्तगत करतो हे तिने सांगितले.

माधुरी विवाहानंतर काही काळ अमेरिकेतच होती व काही वर्षांपूर्वी ती आपल्या कुटुंबासोबत भारतामध्ये परतली. भारतामध्ये आल्यानंतरही तिने आजा नचले, कलंक यांसारख्या चित्रपटांमध्ये आपला अभिनय क्षेत्रातील कमबॅक केले होते मात्र या चित्रपटाला म्हणावे तितके यश मिळाले नाही .अनेक डान्स रिॲलिटी शोजमध्ये माधुरी परीक्षक म्हणून धुरा सांभाळत आहे .तर अक्षय कुमार हा आज सुद्धा बॉलीवूड मधील हुकुमी एक्का मानला जातो. अक्षय त्याच्या अभिनयासोबतच फिटनेस साठी सुद्धा आदर्श मानला जातो.

beingmarathi

Related articles