अल्लू अर्जुनची पत्नी दिसतेय इतकी सुंदर की, फोटो पाहून हृदयाचे ठोके चुकतील

दाक्षिणात्य चित्रपटांमधील कलाकार जगभरामध्ये खूप प्रसिद्ध आहेत. या कलाकारांचे चाहते त्यांच्यासाठी अगदी वेड्या प्रमाणे प्रेम करतात .दक्षिण भारतीय चित्रपट सुद्धा अनेकांना भावतात. दाक्षिणात्य चित्रपटांमधील कलाकारही वैयक्तिक आयुष्यात अगदीच साध्या राहणीमानात राहत असले तरीही त्यांच्या चाहत्यांना या कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी प्रचंड उत्सुकता असते.
विशेषतः या कलाकारांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल किंवा लव्हलाईफबद्दल जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. आर्या या चित्रपटाद्वारे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये आपले दमदार पदार्पण केलेल्या अल्लू अर्जुन ने अगदी अल्पावधीतच आपले टाँलिवुडमधील चित्रपटसृष्टीतील स्थान मजबूत केले आणि तरुणींच्या हृदयाचा ठोका चुकला. अल्लू अर्जुन ची लाईफस्टाईल, लुक्स हे नेहमीच चर्चेत असतात.

अल्लू अर्जुनच्या पत्नीबद्दल ती कोण आहे ,काय करते यासंदर्भात अल्लू अर्जुन च्या चाहत्यांना नेहमीच जाणून घ्यायचे असते. अल्लू अर्जुन या दक्षिण चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार च्या पत्नीचे नाव स्नेहा रेड्डी असून ती कोणतीही अभिनेत्री नाही मात्र तरीही तिच्या सौंदर्यावर सगळेच मोहीत झाल्याशिवाय राहत नाहीत व यामुळेच तिच्या इंस्टाग्राम वरील फोटोज वर लाईक आणि कमेंटसचा नेहमीच वर्षाव होतो .

अनेक लाईफस्टाईल मासिकांमध्ये स्नेहाच्या दिसण्याबद्दल व तिच्या कपड्यांबद्दल भरभरून चर्चा केली जाते.स्नेहा रेड्डी आणि अल्लू अर्जुन यांनी 2011साली प्रेमविवाह केला होता.अल्लू अर्जुन आणि स्नेहा ची पहिली भेट त्यांच्या एका कॉमन मित्राच्या लग्नामध्ये झाली व स्नेहाला पाहताक्षणी अल्लू अर्जुन ला लव अँट फर्स्ट साईट प्रमाणे तिच्याविषयी प्रेम निर्माण झाले व त्याने तिला काही काळानंतर लग्नासाठी विचारले.

तोपर्यंत स्नेहासुद्धा अल्लू अर्जुन वर प्रेम करू लागली होती. त्यामुळे तिने या विवाहासाठी होकार दिला.2011साली विवाहबद्ध झाल्यानंतर या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे .अल्लू अर्जुन आपल्या कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करण्यास प्राधान्य देतो.

स्नेहा चित्रपट सृष्टी मध्ये कार्यरत नसली तरीही ती अल्लू अर्जुन सोबत प्रत्येक कार्यक्रमांमध्ये व सार्वजनिक ठिकाणी सोबत असते व सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळलेल्या असतात. स्नेहा रेड्डी ही कोणत्याही दाक्षिणात्य अभिनेत्री पेक्षा तसूभरही कमी नाही .आजही आम्ही दोघे एकमेकांवर वेड्याप्रमाणे प्रेम करतो असे अल्लू अर्जुन ने एका मुलाखतीत सांगितले होते.