सैफ करिनाशी लग्न करणार आहे हे कळाल्यावर अमृताने केला होता या व्यक्तीला फोन! जाणून घ्या फोनची भानगड

सैफ करिनाशी लग्न करणार आहे हे कळाल्यावर अमृताने केला होता या व्यक्तीला फोन! जाणून घ्या फोनची भानगड

सैफ करिनाशी लग्न करणार आहे हे कळाल्यावर अमृताने केला होता या व्यक्तीला फोन! जाणून घ्या फोनची भानगड

सैफ आणि करिना आता दुसऱ्यांदा आई बाबा होणार आहेत. त्यांच्या संसाराची ८ वर्ष पूर्ण झाली आहेत. या टप्प्यावर आता दुसऱ्यांदा आई बाबा होणार हे स्वाभाविक आहे. मात्र, सैफ आधी २ मुलांचा बाबा आहे म्हणजे तो चौथ्यांदा बाबा होणार आहे. ही मुलं सैफ आणि अमृता सिंगची आहेत. सारा आणि इब्राहिम! अमृता सिंग आणि सैफ वेगळे होऊन अनेक वर्ष लोटली. तिचा हेकेखोर स्वभाव, आतताईपणा यामुळे त्याने तिला सोडले.

एकदा नाते जोडले गेले की, त्यात पुन्हा कितीही बदल झाले तरी लोक चर्चा करणे थांबवत नाहीत. अमृता आणि सैफच्या नात्याचे तसेच झाले. अनेकांना वाटते की, अमृता तिच्या आयुष्यात खूप निराश आहे. मात्र, वास्तव खूप वेगळे आहे. कोणत्याही स्त्रीला आपल्या नवऱ्याने दुसरे लग्न करणे धक्कादायक असते. अमृताला जेव्हा करीना आणि सैफ लग्न करणार कळाले, तेव्हा तिने अबू जानी, संदीप खोसला यांना फोन केला.

या फोनमध्ये अगदी आनंदाने तिने “सैफ लग्न करतोय, त्यासाठी माझ्या लेकीला घालायला अत्यंत सुंदर लेहंगा शीवा” असे सांगितले. त्यात कुठेही द्वेष नव्हता. त्यात कुठेही राग नव्हता. याविषयी स्वतः साराने सांगितले की, अमृताने स्वतः तिला आवरून लग्नाला पाठवले होते.

आता सैफ करीना संसारमग्न असले, तरी अमृता सुद्धा तिच्या आयुष्यात आनंदी आहे. दोन मुले, त्यांचे भविष्य, त्यांचे करीयर यात तिने स्वतः ला वाहून घेतले आहे. तिने भूतकाळात रमणे सोडले आहे. जो गेला, तो जायलाच आला होता. त्याचे आयुष्य तो जगत आहे. या विचाराने तिने आयुष्य जगणे सुरू केले.

हे प्रत्येकाला जमले तर, खरंच सगळेच सुखी होतील. मागील आयुष्य आपले भविष्य घडवू शकत नाही. आणि हे वास्तव आहे. ती जमेल आणि आवडेल त्या चित्रपटात काम करते. दैनंदिन आयुष्य जगते. शेवटी प्रेमाची भावना महत्वाची.

Being Marathi