‘अनुराग कश्यपने’ केली कंगनाची पोलखोल, ‘क्वीन’ चित्रपटाच्या वेळी ‘कंगनाने’ माझ्यासोबत…!

‘अनुराग कश्यपने’ केली कंगनाची पोलखोल, ‘क्वीन’ चित्रपटाच्या वेळी ‘कंगनाने’ माझ्यासोबत…!

सुशांत सिंह राजपूतच्या आ त्म ह त्ये नंतर आरोप-प्रत्यारोपां मुळे व अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीजनी या प्रकरणात आपली मत व्यक्त करून घेतल्यामुळे संपूर्ण बॉलीवूड विविध कंगो-याननी ढवळून निघाले आहे. बॉलीवूड मधील अ म ली पदार्थांचे सेवन, लैं गि क शोषण, कास्टिंग काऊच, नेपोटिझम, दडपशाही या सर्व घटकांमुळे फिल्मी बॅकग्राऊंड नसलेल्या नवख्या कलाकारांना गुणवत्ता असूनही कसे डावलले जाते व यामुळेच हे कलाकार नैराश्याच्या आहारी जाऊन आ त्म ह त्या सारखा पर्याय निवडतात अशा चर्चा प्रसारमाध्यमांवर रंगत आहेत आणि सेलिब्रिटी या मुद्द्यावर आपली मते अगदी रोखठोकपणे यानिमित्ताने मांडत आहे मात्र बॉलिवूडमधील सर्वात फटकळ आणि कोणालाही न घाबरता बोलणारी अभिनेत्री म्हणजे कंगना राणावत सध्या तिच्या ट्विटर आणि अन्य सोशल मीडिया अकाउंट वर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओज मुळे खूप चर्चेत आहे .

कंगणाने सुशांत सिंह राजपूतच्या मृ त्यू ला बॉलिवूडमधील प्रस्थापित निर्माता दिग्दर्शकांना व फिल्मी घराण्यांमधील अभिनेत्यांच्या कंपूला जबाबदार धरले आहे व यासाठी ती रोज कुठल्यातरी नवीन व्यक्तीला टार्गेट करून त्याचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न करते. अ म ली पदार्थांचे सेवन हा बॉलीवूडची नेहमीच एक काळी बाजू मानला गेला आहे.

मात्र तरीसुद्धा आपल्याला क्वीन चित्रपटाच्या वेळी जबरदस्ततीने काही लोकांनी अं म ली पदार्थांचे सेवन करण्यास भाग पाडले गेले होते असा आरोप पण कंगनाने केला आहे. मात्र कंगनाच्या या वक्तव्यावर तिची पोलखोल करून तिच्यावर पलटवार अनुराग कश्यप यांनी केला आहे. अनुराग कश्यप यांनी क्वीन चित्रपटाचे वेळी कंगना स्वतः आपल्याला चित्रीकरण करताना कोणत्याही प्रकारची भीती किंवा  तणाव जाणवू नये यासाठी शँपेनचे सेवन करत असे व एक-दोन वेळा तर तिने आपल्या सोबत बसून शँपेनचे सेवन केले आहे असे त्याने सांगितले.

कंगनाच्या जबरदस्तीने अमली पदार्थांचे सेवन करायला लावले या आरोपांचे खंडन करत त्यांनी आपण काय करत आहोत याची जाणीव आपल्या स्वतःला असली पाहिजे असे सांगून कंगना चा चांगलाच समाचार घेतला आहे. चित्रपटात भूमिका मिळवण्यासाठी कास्टिंग काउचचे प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहेत व मिटू आंदोलनही या अनुषंगाने सुरु झाले आहे. मात्र या मीटू आंदोलनाचा गैरफायदा घेतला जात आहे .

अभिनेता निर्माता दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी आपल्या भूमिका देण्याच्या निमित्ताने बोलावून आपल्यासमोर नग्न अवस्थेत उभे राहून गैरवर्तणूक केल्याचा आरोप पायल घोष या अभिनेत्री ने केला आहे ह्यासाठी तिने पोलिसांकडे तक्रार सुद्धा नोंदवली आहे. अनुरागला ओळखणाऱ्या अनेक अभिनेत्रींनी या प्रकरणांमध्ये अनुराग ला पाठिंबा दिला आहे. इतकेच नव्हे तर त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी व अभिनेत्री कल्कीने  सुद्धा अनुराग असे कृत्य करू शकत नाही असे सांगून अनुरागच्या पाठीशी ठामपणे उभे राहिली आहे.

पायल घोषने केलेल्या आरोपांच्या अनुषंगाने कंगनानेही या वादामध्ये उडी घेऊन त्यावर सडकून टीका केली व त्याची प्रतिक्रिया म्हणून अनुराग कश्यप सध्या कंगनाची पोलखोल करणाऱ्या अनेक घटनांना आपल्या सोशल मीडियावरील अकाउंटवर व्हायरल करत आहे.

beingmarathi

Related articles