वयाच्या ४९ व्या वर्षीसुद्धा ‘ही’ अभिनेत्री दिसते इतकी तरुण आणि सुंदर

काही व्यक्तींना चिरतारुण्याचे जणू वरदानच मिळालेले असते. या व्यक्ती जसे जसे वय वाढत जाते तसे अधिकाधिक तरुण आणि सुंदर दिसू लागतात. आपल्या सर्वसामान्य आयुष्यामध्ये तर अशा व्यक्ती दिसतात मात्र बॉलीवूड च्या झगमगाटाच्या दुनियेतही अशा अनेक अभिनेत्री आणि अभिनेते आहेत जे अगदी पन्नाशीमध्ये सुद्धा पंचविशीच्या तरुणांना लाजवेल इतके तरुण आणि फिट दिसतात.
यापैकीच एक म्हणजे भाग्यश्री ही अभिनेत्री होय. भाग्यश्रीने मैने प्यार किया या सलमान खान च्या गाजलेल्या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेद्वारे पदार्पण केले होते.
तिच्या पहिल्याच चित्रपटाला इतके अफाट यश मिळाले होते कि ती पुढे जाऊन खूप मोठी सुपरस्टार होईल असे भाकीतही केले गेले आणि तिच्याकडे चित्रपटांच्या कित्येक ऑफर सुद्धा आल्या.

मात्र आपल्या करिअरच्या यशाच्या उंचीवर असताना तिने हिमालय दासानी य सोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला व विवाहानंतर तिने चित्रपटांमधून काम करणे काहीसे बंद केले.
तिला मुले झाल्यानंतर पुन्हा काही अन्य भाषांमधील चित्रपटांमध्ये भाग्यश्री चे दर्शन निश्चितच झाले मात्र या सर्वांमध्ये भाग्यश्री ही वयाच्या 49 व्या वर्षी सुद्धा अगदी ही विशीतल्या तरुणी इतकी सुंदर आणि तरुण दिसते हे निश्चितच नवलाची गोष्ट आहे.

भाग्यश्री आजही आपल्या सौंदर्याला आणि फिटनेस ला टिकवून ठेवण्यासाठी खूपच सजग असल्याचे दिसून येते व त्यामुळेच कुटुंब ,मुलांच्या जबाबदाऱ्या इत्यादी सांभाळूनही ती मैने प्यार किया या चित्रपटामध्ये दिसलेल्या भाग्यश्री पेक्षाही अधिक सुंदर दिसते असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.