बॉलीवुडचे हे स्टार किडस ज्यांनी सिनेमात काम न करता निवडले हे हटके करियर.. दुसरे स्टार किड्स तर खूप प्रसिद्ध

1 ) त्रिशला दत्त – संजय दत्त यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी म्हणजे त्रिशला होय. सध्या ती 32 असून ती चित्रपटात काम करत नाही. त्रिशला दिसायला प्रचंड सुंदर असून देखील तिला चित्रपटात काम करायला आवडत नाही. ती सध्या न्यू यॉर्क येथे राहते. तिचे बालपण देखील तेथेच गेले आहे. तिला अनेक मुलाखती मध्ये विचारण्यात आले की तुम्ही चित्रपटात का काम करत नाहीत ? तीन अगदी सरळ उत्तर दिले की मला चित्रपटात काम करायला आवडत नाही. ती पेशाने फॅशन डीइजायनर असून तिचे स्वतचे दोन – तीन ब्रॅंड आहेत. ती कधी -कधी भारतात येते.
2 ) एकता कपूर – एकता प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र यांची मुलगी असून ती अनेक मालिका आणि सिनेमे बनविते. मालिका विश्वात एकताच्या नावाचा खूप दबदबा आहे. एकताच्या अनेक मालिका प्रसिद्ध असून तिने अनेक उत्तम सिनेमे देखील बनविले आहेत. एकता स्वता कधीच चित्रपटात किंवा मालिकेमध्ये काम करत नाही. तिने आजपर्यंत अनेकांचे करियर देखील घडविले आहे.
3 ) श्वेता बच्चन- महानायक अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन देखील बॉलीवूड पासून दूर आहे. तिने आजपर्यंत कोणत्याच चित्रपटात काम केलेले नाही. अमिताब यांनी श्वेताला जाणून – बुजून चित्रपटांपासून दूर ठेवले. श्वेताचे लग्न एका मोठ्या बिजनेस मॅनशी लावून दिले. श्वेता जरी चित्रपट क्षेत्रात नसली तरी तिचे अनेक बॉलीवुड पार्टी आणि कार्यक्रमामध्ये हजेरी असते. श्वेता हिने अनेक बातम्याच्या चॅनल्समध्ये देखील काम केले आहे. श्वेता बच्चन हिचे दोन मुलं असून असे म्हटले जाते की तिची मुलगी ही चित्रपटात काम करणार आहे. अमिताभ बच्चन नेहमी श्वेता बच्चन हिच्या सोबतचे फोटो शेयर करीत असतात.
4 ) रिदिमा कपूर – ऋषि कपूर यांची मुलगी आणि रणबीर कपूर यांची बहीण रिदिमा ही दियासला प्रचंड सुंदर आहे. परंतु तिने देखील नवीन करियर शोधले आहे. रिदिमाचा स्वताचा दागिने बनविण्याचा ब्रॅंड आहे. रिदिमाचे देखील लग्न झाले असून तिला देखील दोन मुलं आहेत. ऋषि कपूर यांच्या निधना नंतर रिदिमा फार चर्चेत आली होती.
5 ) राजविर देवोल – सनी देवोल यांचा मुलगा राजविर हा देखील आता 25 वर्षाचा झाला आहे. परंतु तो अजून देखील बॉलीवुड पासून दूर आहे. असे म्हटले जाते की तो देखील लवकरच बॉलीवुडमध्ये प्रवेश करणार आहे.