‘या’ 5 बॉलिवूड अभिनेत्रींनी अगदी लहान वयातच दिला होता बाळाला जन्म, एकीचे वय तर १८ पेक्षाही होते कमी, बघा कोण आहे ती अभिनेत्री

मातृत्व ही अतिशय सुखद आणि तितकीच जबाबदारीची अनुभूती आहे. मातृत्व अनुभवल्यानंतर त्यासोबतच अनेक जबाबदाऱ्या सुद्धा येतात व त्या पार पाडताना पूर्णवेळ हा आईला आपल्या मुलाला द्यावा लागतो. वर्किंग वुमन ला मातृत्व आणि नोकरी या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळताना तारेवरची कसरत रोजच करावी लागते .अभिनय क्षेत्र हे असेच क्षेत्र आहे जिथे एखाद्या अभिनेत्रीने लग्न केले तरीही तिला मिळणाऱ्या भूमिका अगदी मर्यादित होऊन जातात आणि त्यामध्ये सुद्धा जर ती अभिनेत्री करियरच्या सुरुवातीलाच मातृत्वाला सामोरे जात असेल तर तिचे करिअर धोक्यात येते. मात्र या सर्व मर्यादांना छेद देत काही अभिनेत्रींनी अगदी लहान वयातच मातृत्वाची जबाबदारी स्वीकारली व तितक्याच सक्षमपणे ती जबाबदारी निभावली सुद्धा .आज आपण अशाच काही अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या आपल्या अभिनय क्षेत्रात तर यशस्वी आहेतच मात्र अगदी लहान वयात आई बनून आपल्या मुलांना सुद्धा तितक्याच ताकदीने त्यांनी सांभाळले आहे.

डिंपल कपाडियाः बाँबी या आपल्या पहिल्याच चित्रपटातून आपल्या सौंदर्य, देहबोली, अभिनय आणि कपड्यांच्या स्टाइलमुळे तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनण्याचे भाग्य डिम्पलला लाभले होते. डिंपल आणि ऋषी कपूरची ऑनस्क्रीन केमिस्ट्री अनेक रियल लाइफ मधील कपल्स प्रेरित करून गेली होती.आपल्या या पहिल्या वहिल्या चित्रपटाच्या रिलीज होण्याच्या अगोदरच त्या काळातील सुपरस्टार ज्याच्यावर लाखो तरुणी जीव ओवाळून टाकत असत त्या राजेश खन्नाला डिम्पल खूपच आवडली व त्यांनी विवाह केला. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी डिंपल कपाडिया विवाहबंधनात अडकली आणि त्यानंतर सतराव्या वर्षी तिने एका मुलीला जन्म दिला.ती मुलगी म्हणजेच अभिनेत्री ट्विंकल खन्ना होय .ट्विंकल च्या वेळी गर्भवती असताना डिंपलने बॉबी चित्रपटातील काही राहिलेले प्रसंग चित्रीत केले होते. ट्विंकल च्या जन्मानंतर डिंपल चित्रपट सृष्टी पासून काही काळ दूर राहिली. मात्र त्यानंतर राजेश खन्ना आणि डिंपल मधील संबंध फारसे चांगले राहिले नाही व आपल्या ट्विंकल आणि रिंकी खन्ना या दोन्ही मुलींची जबाबदारी डिंपलने एकटीने समर्थपणे निभावली व बॉलीवूड मध्ये पुन्हा एकदा दमदार कमबॅक केले.

नीतू सिंगः वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी चित्रपट सृष्टी मध्ये पदार्पण केलेल्या नीतू सिंग यांनी अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या.ऋषी कपूर हे त्या काळातील चॉकलेट बॉय नीतू सिंग या चौदा वर्षांच्या तरुणीच्या प्रेमात पडले व नीतू सिंग यांच्यासोबत जवळपास सात वर्षे डेट केल्यानंतर त्या 21 वर्षांच्या झाल्यावर त्यांनी विवाह केला व वयाच्या बाविसाव्या वर्षी नीतू सिंग यांनी रिधिमा या आपल्या मुलीला जन्म दिला. विवाहानंतर नितु सिंग यांनी चित्रपट सृष्टी मध्ये जणू काही अलविदा केले होते. वयाच्या चोविसाव्या वर्षी त्यांनी सध्याचा सुपरस्टार रणबीर कपूर या आपल्या मुलाला जन्म दिला व त्यानंतर त्यांनी पूर्णवेळ आपल्या मुलांच्या संगोपनासाठी दिला.
भाग्यश्रीः मैने प्यार किया या चित्रपटातून सलमान खान सोबत झळकलेली भाग्यश्री नक्कीच भविष्यातील सुपरस्टार असेल असे मत अनेक समीक्षकांनी त्या काळामध्ये व्यक्त केले होते मात्र भाग्यश्रीने आपल्या कुटुंबाला प्रथम प्राधान्य देऊन वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी हिमालय दासानी यांच्यासोबत विवाह केला आणि बाविसाव्या वर्षी तिने मुलाला जन्म दिला. यानंतर भाग्यश्री ही काही निवडक चित्रपटांमध्ये दिसली.
सारिकाः आपल्या सौंदर्य आणि मादक डोळ्यांनी सर्वांना भुरळ घालणाऱ्या सारिका आणि कमल हसन यांनी विवाह होण्याअगोदरच श्रुती हसन या आपल्या मुलीला जन्म दिला होता.श्रुतीचा जन्म झाला त्यावेळी सारिका 26 वर्षांच्या होत्या .त्या वेळी गर्भवती असताना ही सारिका चित्रपटांमध्ये काम करत होत्या.
बबीताः करिश्मा आणि करीना या बॉलीवूड मधील दोन सुपरस्टार बहिणींची आई असलेल्या बबीता यासुद्धा चित्रपट सृष्टीतील त्या काळातील परिचित चेहरा होत्या. मात्र कपूर खानदानाची सून झाल्यानंतर त्यांनी चित्रपटांमध्ये काम करणे सोडले व वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी त्यांनी करिश्माला जन्म दिला व त्यानंतर करीनाचा जन्म झाल्यानंतर त्यांनी आपल्या दोन्ही मुलींना अभिनेत्री बनण्यासाठी प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन पाठिंबा दिला व त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभ्या राहिल्या.
शर्मिला टागोरः आपल्या खानदानी सौंदर्याने सर्वांना मोहित करणाऱ्या शर्मिला टागोर यांनी मन्सूर अली खान पतौडी यांच्या सोबत आपल्या करिअरमधील यशाच्या उंचीवर असताना विवाह केला व यासाठी त्यांनी इस्लाम धर्म ही स्वीकारला. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी त्यांनी सैफ अली खान यांना जन्म दिला व त्यानंतर सोहा अली खान हिचा जन्म झाला.