‘या’ प्रसिद्ध १० बाँलिवुड अभिनेत्रींनी थाटला परदेशात संसार, १० वी अभिनेत्री दिसते खूपच सुंदर

‘या’ प्रसिद्ध १० बाँलिवुड अभिनेत्रींनी थाटला परदेशात संसार, १० वी अभिनेत्री दिसते खूपच सुंदर

 प्रेमाला वय, धर्म, बाह्य सौंदर्य, राष्ट्रीयत्व यांपैकी कोणत्याही गोष्टीचे बंधन नसते. खरे प्रेमवीर हे आपल्या घरच्यांचा विरोध पत्करूनही आपल्या जोडीदारासोबत विवाह करण्यासाठी वेळप्रसंगी साता समुद्रापार जायलासुद्धा तयार असतात.अगदी सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे बॉलिवूडमधील सेलिब्रिटी सुद्धा आपल्या खऱ्या प्रेमाच्या शोधात कधीकधी अगदी सातासमुद्रापार आपले हृदय नेतात आणि तिथेच स्थिरावतात. बॉलिवूडमधील अशाच काही अभिनेत्रींनी परदेशी जोडीदारासोबत विवाह करून परदेशातच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला यामुळे त्यांच्या भारतातील चाहत्यांवर नक्कीच आभाळ कोसळले मात्र सर्व प्रकारच्या ट्रोलर्सला प्रत्युत्तर देत आपला विवाह यशस्वीपणे या अभिनेत्रींनी निभावून दाखवला. अशाच काही अभिनेत्रींबद्दल आपण जाणून घेणार आहोत ज्यांनी परदेशी नागरिकांसोबत विवाह केला आहे व सध्या सुखासमाधानाने संसार करत आहेत.

1) प्रीटी झिंटाःआपल्या अभिनय आणि गालावरच्या खळ्यांनी  सर्वांना मोहून टाकणारी बॉलिवूड अभिनेत्री प्रीटी झिंटा हिने 2018साली जीन गुडनफ या अमेरिकास्थित उद्योगपतीशी विवाह केला.प्रिटी आणि जिन हे  विवाह अगोदर पाच वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते.सध्या प्रिटी जिनसोबत अमेरिकेतच स्थायिक झाली आहे व सध्या अभिनय क्षेत्रापासून दूर आहे.

२) प्रियंका चोपडाःमाजी मिस वर्ल्ड आणि बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री प्रियंका चोप्राने 2018साली नीक जोनास या  अमेरिकेतील प्रसिद्ध गीतकार,गायक व संगीतकार यांच्या सोबत विवाह केला. यावेळी सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आणि हे नाते दीर्घकाळ टिकू शकणार नाही अशी भाकिते सुद्धा केली गेली होती. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या मध्ये केवळ नागरिकत्वाच्या मर्यादा नसून त्यांच्यात मध्ये प्रियांका ही निकपेक्षा  वयाने बरेच मोठी आहे.या दोघांच्याही घरच्यांनी अतिशय सामंजस्याने या विवाहास परवानगी दिली.

3) सेलीना जेटलीः माजी मिस इंडिया आणि बॉलिवूडमधील मोजक्या चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री सेलिना जेटली हिने ऑस्ट्रेलियामधील पीटर हँग यि हॉटेल उद्योजका सोबत विवाह केला व सध्या त्यांना जुळी मुले सुद्धा आहे.सेलिना आपला पूर्ण वेळ सध्या मुलांच्या संगोपनात व्यतित करत आहे.

4) श्रेया सरणः आपल्या बोल्ड आणि ब्युटीफुल लुक्सने सर्वांना घायाळ करणाऱ्या दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील टॉपची अभिनेत्री आणि बॉलिवूडमधील काही चित्रपटांमध्ये आपली जादू दाखवलेली अभिनेत्री श्रिया सरन हिने रशियन वंशाच्या आंद्रे या आपल्या प्रियकरा सोबत विवाह करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.

5) आश्का गोरडियाः आश्का गोरडिया ही भारतीय टेलिव्हिजन क्षेत्रातील आघाडीची अभिनेत्री मानली जाते. आश्का गोरडिया हिने अमेरिकेतील शस्त्रास्त्र पुरवठा करणाऱ्या उद्योजका सोबत 2017 साली विवाह केला.

6) मधु सप्रेः मिलिंद सोमण यांच्यासोबत केलेल्या हॉट फोटोशूट मुळे वादामध्ये सापडलेली सुपरमॉडेल मधु सप्रे हिने 2001 साली ईटली मध्ये स्थित असलेल्या जियान यांच्यासोबत विवाहबद्ध झाली. एका  मित्रामार्फत मधु आणि जियन यांची भेट झाली व जियाने आधी मधुसमोर विवाहाचा प्रस्ताव मांडला.

7) पूर्वी जोशीः बॉलिवूडमधील काही चित्रपट आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील काही मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलेली अभिनेत्री पुर्वी जोशी हिने  अमेरिकेतील एका वित्तीय सल्लागार सोबत 2014 साली विवाह केला. एका अभिनयाशी निगडित कोर्ससाठी काही दिवस अमैरिकेमध्ये गेलेल्या पुर्वीला याच काळामध्ये आपला जोडीदार मिळाला.

8) इलियाना डीक्रूजः इलियाना डीक्रूज नेम आँस्ट्रेलियामध्ये स्थित असलेल्या अँड्रयु नीबोन याच्यासोबत विवाह केला. या दोघांच्या सोशल मीडियावरील त्यांच्या छायाचित्रांना प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळते.
9) शमा सिकंदरः शमा सिकंदर या टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्रीने डॅनियल अनेलि या अमेरिकास्थित कलाकारांसोबत विवाह केला.

10) राधिका आपटे ःआपल्या विविधांगी भूमिकांनी प्रेक्षकांच्या सोबतच समीक्षकांच्या कौतुकास पात्र ठरलेली राधिका आपटे हिने 2012 साली लंडन येथील  संगीतकार बेनडिक्ट टेलर यांच्यासोबत विवाह केला. विवाहानंतरही राधिका भारतामध्ये आपल्या अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत आहे व बेनडिक्ट लंडनमध्ये राहतो या दोघांनी आपले वैयक्तिक आयुष्य आणि करियर यांचा योग्य पद्धतीने मेळ घातला  आहे.

beingmarathi

Related articles