15 वर्षांपूर्वी अशी दिसत होती कॅप्टन कोहलीची बायको .. आता दिसत आहे खूपच वेगळी अनुष्काची ही जुनी जाहिरात पाहिली का ?

सोशल मीडिया आणि सोशल मिडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येतं नाही. 10 काय असो किंवा 15 किंवा अगदी ब्लॅकअँड व्हाइट विडिओ देखील अचानक व्हारल होतो. आता हे पाहा ना ? अनुष्का आणि विराट मागच्या आठवड्यात वेगळ्या कारणांसाठी चर्चेत होते तर या आठवड्यात एका वेगळ्या कारणांसाठी चर्चेत आहेत. अनुष्का सध्या गरोदर आहे आणि ती तिच्या आरोग्याची आणि पोटातील बाळाची काळजी घेण्यात संपूर्ण व्यस्त आहे. मागच्या आठवड्यात विराट अनुष्का कडून व्यायाम करवून घेत होता.

शिरसान करताना अनुष्का अगदी आनंदी गर्भवती दिसत होती. त्यांच्या चाहत्यांनी देखील या फोटोला भरभरून लाईकस दिल्या. अनुष्का आणि विराट हे बॉलीवुड आणि क्रिकेट विश्वातील एक पॉवर फूल कपल आहे. अनुष्का आणि विराट यांच्या लग्नाला आता जवळपास 2 वर्ष पूर्ण झाली आहेत पण त्यांची चर्चा मात्र काही केल्या कमी होतं नाही. आता या आठवड्यात अनुष्का प्रचंड चर्चेत आली आहे. अनुष्काने अनेक हिंदी चित्रपटात काम केले आहे. तसेच फिलोरी सारख्या अनेक हिन्दी चित्रपटांची निर्मिती देखील केली आहे. 2009 साली आलेल्या रब ने बना दी जोडी या चित्रपटातून अनुष्काने बॉलीवुडमध्ये एंट्री केली होती. शाहरुख खान सोबत ती झळकली होती.
या बरोबरच अनुष्काने अनेक जाहिराती देखील केल्या आहेत. अशीच एक 15 वर्षा पूर्वीची जाहिरात सोशल माध्यमांवर व्हायरल झाली आहे. ही जाहिरात सध्या एका यू ट्यूब चॅनलवर व्हायरल होतं आहे. या जाहिरातीत अनुष्काने एका हेअर केअर प्रॉडक्टची जाहिरात केली आहे. जाहिरातीत असे दाखविण्यात आले आहे की अनुष्काला लग्नासाठी एक मुलगा पाहायला येणार असतो. अनुष्काची आई तिला लवकर तयार होण्यास सांगते पण अनुष्का मस्त डान्स करत असते. आणि अचानक मुलाकडचे लोक येतात अनुष्का अगदी काही सेंकदांत तयार होऊन येते. तो मुलगा अनुष्काला पाहताच तिला पसंत करतो अशी ती जाहिरात आहे. अनुष्का या जाहिरातीत खूपच तरुण आणि सुंदर दिसत आहे. तिची ही जाहिरात 2005 सालची आहे. तेव्हाची अनुष्का आणि आताची अनुष्का प्रेक्षकांना खूपच आवडली आहे.