पुष्पा ची रिअल लाईफ पत्नी दिसते खुपच हॉट की,रश्मिका मंदानाही पडते फिकी…

पुष्पा ची रिअल लाईफ पत्नी दिसते खुपच हॉट की,रश्मिका मंदानाही पडते फिकी…

पुष्पा या चित्रपटाच्या यशानंतर या चित्रपटात प्रमुख भूमिका निभावलेला अभिनेता अल्लू अर्जुन हा खूप जास्त चर्चेत आला आहे. या अगोदरही अल्लू अर्जुन हा सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादी मध्ये आघाडीवर होता.मात्र पुष्पा या चित्रपटाच्या यशानंतर अल्लू अर्जुन ने इंडस्ट्रीमध्ये स्वतःची एक वेगळी जागा निर्माण केली आहे हे मात्र निश्चित.या चित्रपटामध्ये अल्लू अर्जुन सोबत रश्मिका मंदाना ही अभिनेत्री प्रमुख भूमिके मध्ये होती.रश्मिका मंदाना आपल्या अभिनयासोबतच आपल्या सौंदर्याबाबत तितकीच प्रसिद्ध आहे.मात्र प्रत्यक्ष आयुष्यामध्ये अल्लू अर्जुन ची पत्नी ही रश्मिका मंदाना लाही सौंदर्याच्या बाबतीत टक्कर देताना दिसून येते.

अल्लू अर्जुन हा यशस्वी अभिनेत्यांपैकी एक अभिनेता आहे.अल्लू अर्जुन चे वडील सुद्धा चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक आहेत.अल्लू अर्जुनने अभिनयक्षेत्रात पदार्पण केल्यापासून कधीही मागे वळून पाहिले नाही व आज घडीला तो सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेत्यांपैकी एक आहे.अल्लू अर्जुन ला एका चित्रपटासाठी 70 ते 80 कोटी रुपये इतके मानधन दिले जाते.नुकतेच त्याने शंभर कोटी रुपयांचे घर खरेदी केले आहे व आपल्या जीवनशैलीमुळे ही तो नेहमी चर्चेत राहतो.

स्नेहा रेड्डी ही खूपच सुंदर असून ती चित्रपट सृष्टी पासून नेहमीच दूर राहते.मात्र सोशल मीडियावरील स्नेहाची छायाचित्रे सर्वांचे मन मोहून घेतात.स्नेहा तिची राहणी,ड्रेसिंग सेन्स यांचे अनेक चाहते आहेत.नेहमी अल्लू अर्जुन सोबत तीची छायाचित्रे वायरल होत असतात.स्नेहा रेड्डी व अल्लू अर्जुन ला दोन मुले आहेत.दोन मुलांच्या जन्मानंतर ही स्नेहा  तितकीच आकर्षक दिसते.इतकेच नव्हे तर ती रश्मिका मंदाना सारख्या अभिनेत्रीनाही आपल्या सौंदर्याने टक्कर देते.

Rohini

Related articles