बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचा ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्यावर जडला जीव…!

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचा ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्यावर जडला जीव…!

सैफ अली खान हा बॉलीवूड मधील एक प्रसिद्ध अभिनेता आहे.तसेच तो वैयक्तिक आयुष्यामध्ये नवाब म्हणूनही प्रसिद्ध आहे.सैफ अली खानचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत असते. सैफने अमृता सिंग सोबत पहिला विवाह केला होता व अमृता सिंग सोबत विभक्त झाल्यानंतर त्याने करीना कपूर सोबत विवाह केला.या दोघीही बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्री आहेत.अमृता सिंग व सैफ अली खान या दोघांना सारा अली खान ही मुलगी आहे.सारा अली खान सुद्धा बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री बनली आहे.

केदारनाथ या चित्रपटाद्वारे साराने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले व यानंतर काही मोजक्या चित्रपटांमध्ये तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.सारा सध्या खूपच चर्चेमध्ये आहे कारण ती दक्षिणेकडील अभिनेत्याला डेट करत असल्याच्या बातम्या आहेत. हा अभिनेता म्हणजे अर्जुन रेड्डी या चित्रपटांमधून सर्वत्र लोकप्रिय झालेला विजय देवरकोंडा होय.

विजय देवरकोंडा आणि सारा अली खान हे सध्या एकमेकांसोबत अनेक ठिकाणी दिसून येतात इतकेच नव्हे तर रात्री उशिरा अनेक पार्टी मध्येही हेच दोघे सोबत असल्याचे दिसून येते.नुकतेच मनिष मल्होत्राने दिलेल्या एका पार्टीमध्ये सारा अली खान विजय देवरकोंडा सोबत दिसून आली व या दोघांमधील जवळीक त्यांच्या छायाचित्रांमधून स्पष्ट दिसून येते.विजय देवरकोंडा दक्षिणेकडील एक लोकप्रिय अभिनेता असून बॉलिवूडमध्ये तो लायगर या चित्रपटाद्वारे पदार्पण करत आहे.

Rohini

Related articles