बॉलीवूड चित्रपट सृष्टीला शोककळा ‘या’ प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रींच्या वडिलांचे दुःखद निधन!

बॉलीवूड चित्रपट सृष्टीला शोककळा ‘या’ प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रींच्या वडिलांचे दुःखद निधन!

प्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडन चे वडील आणि प्रसिद्ध निर्माते व दिग्दर्शक रवी टंडन यांचे आज निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 87 वर्षे होते. रवी टंडन हे प्रसिद्ध निर्माते होते. त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या खुद्दार आणि ऋषी कपूर यांच्या खेल खेल में या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते.

रविना ने वडिलांच्या निधनाचे वृत्त आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून अधिकृतरित्या सांगितले आहे. रविनाने वडिलांसोबत ची काही विशेष छायाचित्रे शेअर केली आहेत व त्याला कॅप्शन देताना तिने अतिशय भावूक होत असे म्हटले आहे की मी तुम्हाला कधीही माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही पप्पा, आय लव यू.

रविना टंडनच्या या पोस्टवर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे. सोनू सूद ,चंकी पांडे ,शिल्पा शेट्टी, नम्रता शिरोडकर या सेलिब्रिटींनी रविना टंडनचे सांत्वन केले आहे. रवी टंडन यांनी  अनहोनी ,खुद्दार ,खेल खेल मे ,जिंदगी यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

beingmarathi