रश्मिका मंदाना करणार ‘या’ अभिनेत्यासोबत विवाह,स्वतः केला खुलासा…!

रश्मिका मंदांना हे नाव टॉलीवुड मधील सुपरस्टार पैकी एक आहे.अल्लू अर्जुन याची प्रमुख भूमिका असलेल्या पुष्पा द राजी या चित्रपटानंतर रश्मिका अधिकच लोकप्रिय झाली आहे.रश्मिकाच्या चाहत्यांमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.त्याचबरोबर तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाल्याचे दिसून येते.अनेकदा असे म्हटले जाते की रश्मिका व अर्जुन रेड्डी या चित्रपटातील अभिनेता विजय देवरकोंडा हे दोघे प्रेमसंबंधामध्ये आहेत.
मात्र या दोघांनीही या गोष्टीचा नेहमीच इन्कार केला आहे.नुकतेच एका मुलाखतीमध्ये रश्मिका ने आपल्या आयुष्यातील प्रेम,लग्न आणि नातेसंबंध या विषयावर खूप मोकळेपणाने मत व्यक्त केले आहे.यामध्ये तिने प्रेम म्हणजे एकमेकांना आदर आणि वेळ देणे व तुम्हाला सुरक्षित वाटते तेव्हा असते असे म्हटले आहे प्रेमाची एक निश्चित अशी व्याख्या केली जाऊ शकत नाही कारण प्रेम हे पूर्णपणे भावनेवर असते असे तिने म्हटले आहे.प्रेम हे कधी एकतर्फी असू शकत नाही हे दोन्ही बाजूंनी होते असे या पंचवीस वर्षीय अभिनेत्रीने म्हटले आहे.
विवाह संस्थेविषयी बोलतांना रश्मिका म्हणते की या विवाह संस्थेबद्दल कोणतेही मत व्यक्त करण्यासाठी मी अजून खूप लहान आहे असे मला वाटते.मात्र ज्या व्यक्तीसोबत तुम्ही खूप मोकळेपणाने काही शेअर करू शकता अशा व्यक्तीसोबत विवाह करणे कधीही चांगले आहे.रश्मिका च्या व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या बॉलिवूडमधील चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.
रश्मिका सिद्धार्थ मल्होत्रा सोबत मिशन मजनू या चित्रपटामध्ये दिसणार असून अमिताभ बच्चन यांच्यासोबत गुडबाय या चित्रपटाचे चित्रीकरण तिने सुरू केले आहे.विजय देवरकोंडा लायगर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.पुष्पा व राइज या चित्रपटाचा सिक्वल येणार असून या चित्रपटाचे नाव पुष्पा द रूल असणार आहे.या चित्रपटामध्येही रश्मिका प्रमुख भूमिकेत असेल.