लता मंगेशकर ‘या’ व्यक्तीच्या नावाने लावायच्या सिंदूर,अभिनेत्री तब्बस्सुम यांनी केला खुलासा…

लता मंगेशकर ‘या’ व्यक्तीच्या नावाने लावायच्या सिंदूर,अभिनेत्री तब्बस्सुम यांनी केला खुलासा…

भारताची गानकोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व भारताची शान समजल्या जाणा-या लता मंगेशकर यांचे सहा फेब्रुवारी रोजी वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले.लतादीदींच्या निधनाने केवळ भारतच नव्हे तर‌ संपूर्ण जगभरातील चाहते हळहळले. लताजींच्या मधुर आवाजाचे व गाण्यांच्या चर्चा या संपूर्ण जगभरात ऐकल्या जातात.मात्र आज आपण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडित एका महत्त्वाच्या गोष्टी विषयी जाणून घेणार आहोत.

लतादीदींनी आयुष्यभर विवाह केला नाही व त्या अविवाहित राहिल्या.मात्र त्यांच्या भांगे मध्ये कायम सिंदूर दिसत असे. अविवाहित असूनही त्या कोणाच्या नावाने सिंदूर लावत असाव्यात हा प्रश्न अनेकांना पडत असे.बॉलिवूडमधील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री  तब््बस्सूम यांनी लताजी कोणाच्या नावाने सिंदूर लावत असत या गोष्टीचा खुलासा केला आहे.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी गोष्टीचा खुलासा केला आहे.त्यांनी लताजींना त्या कोणाच्या नावाने सिंदूर लावतात असे विचारले होते.यावेळी त्यांनी सांगितले की भारतामध्ये आपल्या पतीला परमेश्वर मानले जाते व त्याच्या नावाने सिंदूर भरला जातो.मात्र लताजींसाठी त्यांचे संगीत हेच परमेश्वर होते व म्हणून त्या संगीता च्या नावाने सिंदूर भरत असत.लताजींनी कधी आपल्या प्रेम कहानी विषयी उघडपणे वक्तव्य केले नाही.

लता मंगेशकर यांना बीसीसीआयचे अध्यक्ष राजसिंह डुंगरपुर यांच्याविषयी प्रेमभावना होत्या असे सांगितले जाते.मात्र राजसिंह डुंगरपूर यांनी आपल्या आई-वडिलांना असे वचन दिले होते की ते कधीही साधारण कुटुंबातील मुली सोबत विवाह करणार नाही तर एका राजघराण्यातील मुली सोबतच विवाह करतील.राजसिंह डुंगरपुर स्वतः राजघराण्यातील होते म्हणून लता मंगेशकर यांच्यासोबत ते विवाह करू शकले नाहीत व ते सुद्धा आजन्म अविवाहितच राहिले.

Rohini