शाहरुख खानच्या अगोदर कोण होता ‘मन्नत’ बंगल्याचा मालक…

शाहरुख खानच्या अगोदर कोण होता ‘मन्नत’ बंगल्याचा मालक…

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खानने आपल्या अभिनयामुळे केवळ भारतामध्येच नव्हे तर परदेशात सुद्धा आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडले आहे.शाहरुख खान हा केवळ अभिनयच नव्हे तर श्रीमंतीच्या बाबतीत सुद्धा जगभरातील काही मोजक्या श्रीमंत कलाकारांपैकी एक मानला जातो.चित्रपटाचा सृष्टीमध्ये आपले स्थान मिळवण्यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये मुंबईमध्ये अक्षरशः समुद्रकिनारी रात्र घालवणारा शाहरुख खान आज मुंबईतील वांद्रे या आलिशान भागांमध्ये एका अतिशय महागड्या घरांमध्ये आपली मूले आपल्या कुटुंबासोबत राहतो.

शाहरुखच्या या घराचे नाव मन्नत असून मन्नत हा बंगला केवळ बाहेरुनच आकर्षक दिसत नसून आज सुद्धा खूप आलिशान व अत्याधुनिक सोयीसुविधांनी नटलेला आहे.शाहरुख खान चे दर्शन व्हावे म्हणून त्याचे अनेक चाहते मन्नत घराबाहेर तासन्तास त्याची वाट पाहत असतात.मन्नत हा बंगला शाहरुख खानने स्वतः बांधलेला नसुन तो विकत घेतलेला आहे.या अगोदर हा बंगला केकू नावाच्या व्यक्तीचा होता.केकू गांधी हे एक शिल्पकार आणि गॅलरीस्ट होते.शाहरुख ने हा बंगला विकत घेण्या अगोदर या बंगल्याचे नाव वीला वियाना असे होते.

याच्या जवळच असलेल्या इमारतीचे नाव केली मंजिल असे आहे ही इमारत सुधा केकू गांधी यांच्या मालकीची होती.सुरवातीला केकू गांधी यांचे आजोबा माणेकजी बाटलीवाला या बंगल्या मध्ये राहात असत व केकू गांधी यांची आई विला वियाना मध्ये राहत असत.काही काळानंतर आर्थिक नुकसान मुळे विला विषयांना भाड्याने देण्यात आला व माणेकजी बाटली वाला आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत केकी मंजिल येथे राहण्यास गेले.यानंतर विला वियाना अर्थातच मन्नत हा बंगला नरिमन दुबाश यांनी खरेदी केला.शाहरूखने मन्नत हा बंगला नरिमन दुबाश यांच्याकडून 13 .32 कोटी रुपयांना विकत घेतला.

असे सांगितले जाते की दुबाश हे  शाहरुख खान ला हा बंगला विकण्यास राजी नव्हते. हा बंगला विकत घेण्यासाठी शाहरुखला नरिमन दुबाश यांना खूप गळ घालावी लागली होती.या बंगल्या चे ठिकाण व रचना यामुळे शाहरुख खान ला कोणत्याही किमती मध्ये हा बंगला खरेदी करायचा होता.बंगला विकत घेतल्यानंतर शाहरुखला या बंगल्याचे नाव जन्नत असे ठेवण्याची इच्छा होती .मात्र हा बंगला विकत घेतल्यानंतर शाहरुखच्या आयुष्यातील अनेक स्वप्न व इच्छा पूर्ण झाल्या म्हणून त्याने या बंगल्याचे नाव मन्नत असे ठेवले.

Rohini