सख्या बहिणी असून देखील ‘या’ कारणामुळे करिष्मा आणि करीना करत नाही चित्रपटात एकत्र काम…!

सख्या बहिणी असून देखील ‘या’ कारणामुळे करिष्मा आणि करीना करत नाही चित्रपटात एकत्र काम…!

बॉलीवूड मध्ये आजही कपूर घराणे हे बॉलीवूडच्या यादीतील पहिले मानाचे घराणे मानले जाते.एक काळ असा होता जेव्हा कपूर घराण्यातील सर्वच पुरूष बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून सक्रिय होते मात्र घरातील महिला बॉलीवूड पासून खूपच लांब होत्या.नंतरच्या पिढीमध्ये मात्र खूप मोठे बदल घडून आले व रणधीर कपूर यांच्या मुली करिष्मा कपूर आणि करिना कपूर या दोघींनीही जणूकाही बंड पुकारत बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली व या ठिकाणी यशस्वी अभिनेत्री म्हणून स्थिर सुद्धा झाल्या.

करिष्मा कपूरने प्रेम कैदी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले तर 2000 साली आलेल्या रिफ्यूजी या चित्रपटामधून करीना कपूर ने बॉलिवूडमध्ये आपले पाय ठेवले.या चित्रपटामधील करिश्माचा अभिनय व लूक चाहत्यांच्या खूपच पसंतीस पडला व समीक्षकांनीही तिच्या कामाची प्रशंसा केली.या चित्रपटासाठी करीनाला त्यावर्षीचा बेस्ट फीमेल डेब्यूचा फिल्मफेअर पुरस्कार सुद्धा मिळाला होता.

चित्रपट सृष्टी मध्ये यशस्वी होत असतानाच करीना आणि करिश्मा दोघीही आपल्या दिसण्यामुळे व राहणी मुळे सुद्धा खूप लोकप्रिय आहेत.रिफ्यूजी चित्रपटाच्या वेळी करीनाचे वय अवघे वीस वर्षांचे होते व या चित्रपटातील तिच्या दिसण्यावर अनेक चाहते फिदा झाले होते.करिश्मा आणि करीना यांच्याप्रमाणेच बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री बहिणींच्या जोड्या आहेत मात्र या सर्वांमध्ये करिश्मा आणि करीना या सर्वाधिक लोकप्रिय जोडी मानल्या जातात.

या दोघेही एका क्षेत्रामध्ये असून आतापर्यंत एकत्र चित्रपटामध्ये अभिनय का केला नाही हा प्रश्न सर्वांनाच पडतो.करीनाने या संदर्भात असे म्हटले होते की तिला नेहमीच करिष्मा सोबत काम करण्याची खूप इच्छा आहे मात्र आत्तापर्यंत असे कथानक समोर आले नाही की जे दोघींना एकत्र काम करण्यासाठी पसंत पडेल.जर दोघींसाठी अनुकूल असे एखादे कथानक समोर आले तर नक्कीच भविष्यात त्या एकत्र काम करतील.

असे सांगितले जाते की करीना आणि करिश्मा या दोघींना एकत्र घेऊन झुबेदा या चित्रपटाचा सिक्वल येणार होता मात्र काही कारणांमुळे अगदी अखेरच्या क्षणी हा चित्रपट फिस्कटला.करिश्माने या संदर्भात एका मुलाखतीमध्ये असे म्हटले होते की मी आणि करीना दोघींनी एका चित्रपटांमध्ये काम करणे ही खूप मोठी गोष्ट असेल म्हणूनच आम्ही एखाद्या खास कथानका साठीच एकत्र काम करू.कोणत्याही स्क्रिप्टवर काम करण्याची आमची इच्छा नाही.

Rohini