५ वर्षाच्या तैमूर ला मिळाली ‘व्हॅलेंटाईन’,स्वतः करिनाने शेअर केले फोटो…

५ वर्षाच्या तैमूर ला मिळाली ‘व्हॅलेंटाईन’,स्वतः करिनाने  शेअर केले फोटो…

बॉलिवूडमधील सर्वात जास्त चर्चिल्या जाणाऱ्या स्टार किड्स पैकी एक म्हणजे तैमूर अली खान होय.तैमूर अली खान त्याचे आई वडील करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या पेक्षा सुद्धा जास्त लोकप्रिय असल्याचे दिसून येते.तैमूरच्या जन्मापासून त्याच्या छायाचित्रा वर खूप मोठ्या प्रमाणात कमेंट झाल्याचे दिसून येतात व खूप कमी वयामध्ये तैमूर ने खूप जास्त लोकप्रियता मिळवल्याचे ही दिसून येते.

तैमूर ची लोकप्रियता त्याच्या जन्मानंतर आत्तापर्यंत कमी न झाल्याचे दिसून येते.करीना कपूर सोशल मीडियाच्या माध्यमातून तैमूर शी निगडीत अनेक गोष्टी शेअर करत असते व यामुळेच कदाचित इतक्या लहान वयात तो इतका जास्त लोकप्रिय झाला आहे.तैमूर ची काही छायाचित्रे करीनाने व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी शेअर केली आहेत.यामध्ये तैमूर कशाप्रकारे व्हॅलेंटाईन डे साजरा करत आहे हे तिने दाखवले आहे.

बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी व्हॅलेंटाईन डे साजरा केला व पार्टीजला हजेरी लावली.या छायाचित्रांमध्ये तैमूर सैफ अली खान सोबत बसलेला दिसून येतो व यामध्ये त्याने आपल्या हातात चॉकलेट आइस्क्रीम धरलेले आहे.चॉकलेट आइस्क्रीम मिळाल्यानंतरचा त्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.या फोटोला कॅप्शन देताना करीनाने लिहिले आहे तैमूरला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी त्याचे प्रेम चॉकलेट आइस्क्रीम मध्येच मिळालेले आहे.

Rohini

Related articles