मराठी चित्रपट सृष्टीला शोककळा, ‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचे नि’धन…

मराठी चित्रपट सृष्टीला शोककळा, ‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचे नि’धन…

गेल्या काही काळामध्ये अनेक ज्येष्ठ कलाकारांना अभिनयक्षेत्राने गमावले आहे. यामध्ये अगं बाई सासूबाई  या मराठी टेलिव्हिजन क्षेत्रातील लोकप्रिय मालिकेतील सर्वांच्या हृदयाचा ठाव घेणारे आजोबा अर्थातच  ज्येष्ठ कलाकार रवी पटवर्धन यांच्या निधनाच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांना व एकूणच अभिनय क्षेत्रातील मंडळींना खूप मोठा धक्का बसला आहे. रवी पटवर्धन यांचे वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले.

रवी पटवर्धन यांचे सहा डिसेंबर च्या सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाले. त्यांचे निधन त्यांच्या राहत्या घरी झाले. त्यांच्या पश्चात त्यांची दोन मुले, पत्नी, सुना ,मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. काही वृत्तपत्रांच्या अहवालानुसार कोरोनाच्या संक्रमाना नंतरच्या काळामध्ये रवि पटवर्धन हे मालिकांच्या चित्रीकरणाच्या सेटपासून  एक प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दूरच राहत होते.

पाच डिसेंबरच्या रात्री रवी पटवर्धन यांना श्वासोच्छ्वासाचा त्रास होऊ लागला व त्यापाठोपाठ त्यांची शुद्ध हरपल्यामुळे त्यांना जवळच्या इस्पितळात हलवण्यात आले.मात्र या ठिकाणी त्यांचा श्वास थांबला असे त्यांचा मुलगा निरंजन पटवर्धन यांनी सांगितले. रवी पटवर्धन यांचे अंतिमसंस्कार हे सहा डिसेंबरच्या दुपारी ठाण्यामध्ये करण्यात आले.

सहा सप्टेंबर 1937 रोजी रवी पटवर्धन यांचा जन्म झाला होता. या ज्येष्ठ कलाकाराने दीडशेहून अधिक नाटकांमध्ये व जवळपास दोनशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. यामध्ये मराठी आणि हिंदी भाषेतील चित्रपटांचा समावेश होता. नुकत्याच प्रसारित होत असलेल्या अगबाई सासुबाई या मराठी मालिकेतील त्यांच्या आजोबांच्या पात्राला खूपच लोकप्रियता मिळाली .अजय मयेकर या मालिकेचे निर्माते व दिग्दर्शक आहेत. त्यांनी कोंबडीच्या, चप्पल चोर असे आता कोण हाक मारणार असे म्हणत रवी पटवर्धन यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

या मालिकेतील प्रमुख कलाकार निवेदिता सराफ ,अशोक पत्की आणि तेजश्री प्रधान यांनी सुद्धा रवी पटवर्धन यांना श्रद्धांजली वाहिली असून या सर्व कलाकारांना रवि पटवर्धन यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे खूप मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आज रवी पटवर्धन यांना श्रद्धांजली वाहिली. यामध्ये त्यांनी रवी पटवर्धन यांच्या जाण्यामुळे चित्रपट सृष्टीला व अभिनयक्षेत्राला खूप मोठा धक्का बसला आहे.

तसेच रवी पटवर्धन हे एक खूप मोठे कलाकार होते त्यांच्यासाठी वयाचा कोणताही अडथळा नव्हता. छोट्या-मोठ्या कोणत्याही प्रकारच्या भूमिकेमध्ये तितक्याच जिद्दीने व तळमळीने ते अभिनय करत असत. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. त्यांच्या जाण्यामुळे संपूर्ण अभिनय क्षेत्राची खूप मोठी हानी झाली आहे अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.मराठी मालिकांव्यतिरिक्त  रवी पटवर्धन यांनी अंकुश, तेजाब ,अशा असाव्या सुना, उंबरठा यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.

beingmarathi