दुबईच्या रणीने बॉडीगार्ड सोबत अफेयर, अफेयर लपविण्यासाठी चक्क दिले ‘इतके’ कोटी, किंमत बघून व्हाल थक्क

दुबईच्या रणीने बॉडीगार्ड सोबत अफेयर, अफेयर लपविण्यासाठी चक्क दिले ‘इतके’ कोटी, किंमत बघून व्हाल थक्क

लंडनच्या राजघराण्यांप्रमाणेच जगभरातील शासकांची घराणी ही या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात. या शासकांच्या राहणीमान, त्यांचे कुटुंबीय व विलासी आयुष्य या विषयी अनेक सुरस व रंजक कथा प्रसारमाध्यमांद्वारे चर्चिल्या जातात व या घराण्यांविषयी एक प्रकारचे अप्रूप जनसामान्यांमध्ये नेहमीच असते.

दुबईच्या शासकाचे वैयक्तिक आयुष्य सध्या चर्चेत असून त्याचे कौटुंबिक आयुष्य हे जणू काही चव्हाट्यावर आले आहे याला कारण म्हणजे दुबईच्या शासकाच्या पत्नीचे तिच्या अंगरक्षक का सोबत असलेले अनैतिक संबंध व या विवाहबाह्य संबंधांना झाकून ठेवण्यासाठी तिने देऊ केलेले तब्बल बारा कोटी इतकी रक्कम होय.

प्रिन्सेस हया दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतुम.यांच्या सहाव्या पत्नी होत. प्रिन्सेस हया यांचे त्यांच्याच ब्रिटिश अंगरक्षकका सोबत विवाहबाह्य संबंध होते व हे संबंध लपवून ठेवण्यासाठी जणूकाही लाचेच्या स्वरूपात त्यांनी या अंगरक्षकाला 12 कोटी रुपये व वेळोवेळी अनेक  महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या.

2019 साली मोहम्मद यांनी प्रिन्सेस हया यांना कोणतीही अधिकृत सूचना न देता शरिया कायद्याअंतर्गत घटस्फोट किंवा तलाक दिला होता. या घटस्फोटाची सुनावणी ब्रिटिश न्यायालयामध्ये चालू होती.

46 वर्षीय प्रिन्सेस हाया यांचे त्यांच्या ब्रिटिश अँग्रक्षक 37वर्षीय रसेल फ्लॉवर्स याच्यासोबत विवाहबाह्य संबंध होते व त्याने आपल्याच सोबत रहावे यासाठी त्यांनी त्याच्यावर  पैसे व भेटवस्तूंचा वर्षाव केला होता असे फ्लॉवर्स च्या पत्नीने प्रसारमाध्यमांना सांगितले .रसेलच्या पत्नीला जेव्हा प्रिन्सेस हया आणि रसेल यांच्यामधील संबंधा बद्दल समजले तेव्हा तिच्यासाठी हा  खूप मोठा धक्का होता व तिने रसेलसोबतचे वैवाहिक आयुष्य संपवण्याचा निर्णय घेत घटस्फोट घेतला.

लंडन येथील न्यायालयामध्ये प्रिन्सेस हया यांच्या दोन मुलांच्या कस्टडी बद्दल चालू असलेल्या निकालाच्या वेळी प्रिन्सेस हया यांचे त्यांच्या एका खाजगी अंगरक्षकका सोबत विवाहबाह्य संबंध होते असा दावा करण्यात आला होता. त्यावेळी हे प्रकरण समोर आले ।मात्र न्यायालयाने त्यांना त्यांच्या अल्पवयीन मुलांची कस्टडी दिली व सध्या त्या लंडन येथे आपल्या दोन मुलांसोबत आयुष्य जगत आहेत.

प्रिन्सेस हया या जॉर्डन च्या राजाच्या कन्या असून 2018साली मोहमम्मद बिन राशिद अल मकतुमला आपल्या पत्नीच्या विवाहसंबंध बाबत कळल्यानंतर हया यांनी दुबई सोडले व त्या लंडनला स्थायिक झाल्या.

beingmarathi