या अभिनेत्रीनी केली आहे प्लॅस्टिक सर्जरी .. तिसरी अभिनेत्री तर दिसत आहे फारच सुंदर

या अभिनेत्रीनी केली आहे प्लॅस्टिक सर्जरी .. तिसरी अभिनेत्री तर दिसत आहे फारच सुंदर

बॉलीवुड आणि बॉलीवुडमध्ये केले जाणारे अनेक प्रयोग हे नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. आता हेच पहाना बॉलीवूडमध्ये अनेक अभिनेत्री सुंदर दिसण्यासाठी प्लॅस्टिक सर्जरी करतात . कारण बॉलीवूडमध्ये सुंदर दिसण्यासास खूप जास्त महत्व आहे. जर तुम्ही सुंदर दिसत असाल तर तुम्हाला यश मिळणे अधिक सोप्पे जाते. त्यामुळे बॉलीवूडमध्ये अनेक अभिनेत्री स्वताच्या चेहऱ्याला प्लॅस्टिक सर्जरी करून घेतात. प्लॅस्टिक सर्जरी करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात खर्च येतो. या बरोबरच प्लॅस्टिक सर्जरी किती यशस्वी होईल हे देखील सांगता येत नाही.

त्यामुळे प्लॅस्टिक सर्जरी करणे हे एक जोखमीच काम आहे. तरी देखील अनेक अभिनेत्री ही जोखीम स्वीकारतात. बॉलीवुडमध्ये या गोष्टीची अनेक उदाहरणे आहेत. ज्यांच्या प्लॅस्टिक सर्जरी सफल आणि असफल देखील झाल्या आहेत. काही अभिनेत्री फक्त ओठांची सर्जरी करतात तर काही अभिनेत्री नाकाची तर काही इतर अवयवांची. आज आपण अशा काही अभिनेत्री पाहणार आहोत , ज्यांनी प्लॅस्टिक सर्जरी करून घेतली आहे. आणि आता त्या फारच सुंदर दिसत आहेत.

1 ) श्रुती हसन – बॉलीवुड आणि साऊथच्या चित्रपटात श्रुतीचे प्रचंड नाव आहे. श्रुतीचे करोडो फॅन्स देखील आहेत. श्रुती प्रचंड सुंदर दिसते , त्यामुळे तिचे अनेक दिवाने आहेत. श्रुती प्रसिद्ध अभिनेते कमल हसण यांची मुलगी आहे. श्रुती बॉलीवूडमध्ये येण्या अगोदर इतकी सुंदर नव्हती. अगदी सर्वसामान्य मुलीप्रमाणे ती दिसत होती. पण बॉलीवूडमध्ये येण्याअगोदर श्रुतीने तिचे ओठ आणि नाक यांची प्लॅस्टिक सर्जरी करून घेतली त्यामुळे ती अधिकच सुंदर दिसू लागली.

2 ) जाह्नवी कपूर – प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जाह्नवी कपूर – नेहमीच चर्चेत असते. तिने नुकतेच हिन्दी चित्रपटात पदार्पण केले आहे. मराठी सिनेमा सैराट त्याचाच रीमेक धडकन बनविण्यात आला त्यामध्ये जाह्नवी कपूर आपल्याला दिसली होती. जाह्नवी देखील दिसण्यास खूप सुंदर आहे. परंतु तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की जाह्नवी कपूर – हिने देखील चेहऱ्याची प्लॅस्टिक सर्जरी केली आहे. अभिनेत्री श्रीदेवी हिने देखील तिच्या ओठांची सर्जरी केली होती. तेव्हा तिच्यावर देखील खूप ठिका करण्यात आली होती. जानव्हीचे अनेक जुने फोटो तुम्हाला सोशल मिडियावर पाहायला मिळतील. हे पाहून नक्कीच तुमच्या लक्षात येईल तिने कशा प्रकारे सर्जरी केली आहे.

3 ) शिल्पा शेट्टी – शिल्पा शेट्टी म्हणजे बॉलीवुडमधील सर्वाधिक फिट व्यक्ति म्हणजे शिल्पा आहे. शिल्पा एक चांगली आई आहे , बायको , मैत्रीण , आणि मुलगी देखील आहे. शिल्पा दिवसेंदिवस खूपच सुंदर दिसत आहे. या मागील एक राज आहे तो राज आहे योगा. शिल्पा तिच्या सुंदर दिसण्याचे संपूर्ण श्रेय योगाला देते. पण त्याहून अधिक शिल्पा हिने देखील तिच्या चेहेऱ्याची प्लॅस्टिक सर्जरी केली आहे. त्यामुळे ती अधिक सुंदर दिसत आहे. जर तुम्ही शिल्पाचा जुना चित्रपट बाजीगर पाहिला तर तुमच्या लक्षात येईल तिने कशा प्रकारे स्वताच्या चेहऱ्याची सर्जरी केली आहे. शिल्पा सध्या दोन मुलांची आई असून तीने स्वता एका मुलाला जन्म दिला आहे, तर दुसरी मुलगी ही सरोगासी द्वारे प्राप्त केली आहे.

4 ) प्रियंका चोपडा – प्रियंका हे देखील बॉलीवुडमधील नेहमी चर्चेत असणारे नाव आहे. तिने गेल्या वर्षी अमेरिकन सिंगर निक जॉनस यांच्याशी विवाह केला. प्रियंका देखील नेहमी वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असते. प्रियंका 2000 साली मिस वर्ल्ड झाली त्या नंतर तिने तिच्या ओठांची आणि नाकाची प्लॅस्टिक सर्जरी केली आणि त्या नंतर ती बॉलीवुड मधील देसी गर्ल बनली. प्रियंका बॉलीवुड आणि हॉलीवुड दोन्हीमध्ये देखील तितकीच प्रसिद्ध आहे.

5 ) अनुष्का शर्मा – अनुष्का शर्मा ही देखील प्लॅस्टिक सर्जरी केली आहे. तिने देखील ओठ आणि नाक यांची सर्जरी केली आहे. तुम्हाला कोणत्याही अभिनेत्रीचे जुने फोटो आणि नवीन फोटो पाहिले तर लगेच तुमच्या लक्षात येईल त्यांच्या चेहऱ्यांमध्ये किती बदल झाला आहे.

Being Marathi

Related articles