प्रसिद्ध खलनायक रणजीत ची मुलगी आहे खूपच सुंदर, बाँलिवुडमधील अनेक अभिनेत्रींंनाही देते टक्कर, पहा फोटो…

भारतीय चित्रपट सृष्टीने जसे उत्कृष्ट नायक घडवले तसेच अनेक दर्जेदार खलनायक सुद्धा निर्माण केले. भारतीय चित्रपट सृष्टी मध्ये असे अनेक खलनायक आहेत जे त्यांच्या प्रत्यक्ष नावाने नव्हे तर त्यांच्या भूमिकांच्या नावांमुळे प्रसिद्ध आहेत. या खलनायकांचे आँन स्क्रीन काम इतके उत्कृष्ट होते की प्रत्यक्ष जीवनातही लोक त्यांच्यापासून घाबरून चार हात लांब राहणेच पसंत करत असत त्यामुळे त्यांना कधीकधी त्रास सुद्धा होत असे.
मात्र ही निश्चितच त्यांच्या कामाची पावती होती. 80 आणि 90च्या दशकाला निरनिराळ्या चित्रपटांमध्ये जवळपास 200 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये आपल्या खलनायकी भूमिका द्वारे रंग भरणाऱ्या पैकी एक म्हणजे रणजीत होय.रणजीत यांची ओळख ही कामपिपासू व अतिशय खल प्रवृत्तीचा खलनायक अशीच बनली होती व त्याला त्याच प्रकारचे रोल पुढील काळात मिळाले . रणजीत यांनी चित्रपट सृष्टी प्रमाणे छोट्या पडद्यावरही आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवले आहेत.

नायकांप्रमाणेच खलनायक सुद्धा आपल्या प्रत्यक्ष वैयक्तिक आयुष्यात कसे आहेत याबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता असते. पडद्यावर खलनायकाची भूमिका साकारणारे रंजीत प्रत्यक्ष आयुष्यामध्ये मात्र अतिशय कुटुंबवत्सल आणि प्रेमळ व्यक्ती आहेत. त्यांचे मूळ नाव गोपाळ बेदी असून आपल्या कुटुंबासोबत सध्या ते अतिशय साधेपणाने आपले जीवन व्यतीत करत आहेत.

त्यांनी आपल्या कुटुंबाला व खाजगी आयुष्याला नेहमी प्रसारमाध्यमांपासून दूर ठेवले.रंजीत यांची मुलगी दिव्यांका बेदी ही सोशल मीडियावर खूपच प्रसिद्ध आहे ते तिच्या लुक्स मुळे .दिव्यांका ही एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर असून तिच्या फिटनेसची निगडीत छायाचित्रांना विशेष पसंती दिली जाते. सौंदर्याच्या बाबतीत कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्री ला सहजपणे टक्कर देऊ शकणारी दिव्यांका अभिनय क्षेत्रांमध्ये मात्र रस घेत नाही.