‘या’ घटनेनंतर रवीनाने संजूबाबाचे फोटो सगळ्या रूमभर लावले होते. मात्र तिच्या मनासारखे झाले नाही

‘या’ घटनेनंतर रवीनाने संजूबाबाचे फोटो सगळ्या रूमभर लावले होते. मात्र तिच्या मनासारखे झाले नाही
संजूबाबा आणि त्याचे करीयर हा, त्याच्या कर्करोगामुळे पुन्हा चर्चेत आलेला विषय आहे. संजू बाबा हा तसा शांत स्वभावाचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. मात्र, त्याच्या आयुष्यातील चढ-उतार आणि वाद याने तो चर्चेत राहिला आहे. बॉलीवुडमध्ये अनेकदा हॉट हिरोईनच्या मागे हिरो वेडे होतात, असे किस्से समोर येतात. तिच्यासाठी काहीपण म्हणून हद्द पार करणारे अनेक हिरो आहेत. मात्र एखादी अभिनेत्री असे काही करते हे अगदी नवीन आहे.
रविना टंडन ही ९० च्या काळात अनेकांच्या गळ्यातील ताईत होती. मात्र,तिला आवडत होता संजय दत्त! तिच्या मनात त्याच्याविषयी खूप प्रेम होते. त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे तिला आकर्षण वाटू लागले. ती त्याच्या मूव्ही पाहून त्याची फॅन झाली. १९९४ मध्ये जमानेसे क्या डरना या सिनेमात तिला संजय दत्त सोबत काम करायचे होते, तेव्हा तिला स्वतः च्या नशिबावर विश्वास बसत नव्हता.
जेव्हा ती या शूटिंग दरम्यान घोडेस्वारी करताना पडली, तेव्हा ती बेशुद्ध झाली होती. शूटिंग जंगलात सुरू होतं म्हणून दवाखाना सुद्धा जवळ नव्हता. त्यावेळी, तिच्या कानातून रक्त येऊ लागलं. तिला दवाखान्यात नेणे गरजेचे होऊन बसले. तेव्हा तिथून संजूबाबाने तिला आपल्या दोन्ही हातात उचलून दवाखान्यात नेले होते. ही गोष्ट तिला कळल्यावर ती वेडीच झाली. तिने संजू बाबाचे फोटो सगळ्या रूम भर लाऊन टाकले.
संजय दत्तला तिच्या विषयी काही प्रेम वगैरे नव्हते. पण संजय दत्तने तिच्या भावनांचा आदर ठेवला. ते दोघे उत्तम मित्र आहेत. आजही एकमेकांच्या संपर्कात असतात. पुढे चालून रविणाचे नाव अभिनेता अक्षय कुमारसोबत जोडले गेले. अक्षय आणि रवीनाने साखरपुडा केला होता अशी चर्चासुद्धा होती.