सुपरस्टारच्या गाडीला धडकला हा सर्वसामान्य मुलगा आणि बनला बॉलीवुडमधील नंबर वन खलनायक , जाणून घ्या कोण आहे तो खलनायक

सुपरस्टारच्या गाडीला धडकला हा  सर्वसामान्य मुलगा आणि बनला  बॉलीवुडमधील  नंबर वन  खलनायक , जाणून घ्या कोण आहे तो खलनायक

बॉलीवुडमध्ये प्रत्येक कलाकरांची स्वताची एक गोष्ट आहे. त्या गोष्टी इतक्या रंजक असतात की प्रत्येकाच्या आयुष्यावर एक चित्रपट बनू शकतो. काही लोकांच्या आयुष्यात एखादी घटना घडते आणि त्या व्यक्तीच आयुष्यच बदलून जात .बॉलीवुड मधील प्रसिद्ध आणि लाडके खलनायक , विनोदी नायक शक्ती कपूर यांच्या आयुष्यात देखील अशाच काही घटना घडल्या की त्यांच संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. समजा तुम्ही असा विचार करा की तुम्हाला एखाद्या चार चाकी चालवत असलेल्या व्यक्तीने तुम्हाला धडक दिली तर तुम्ही काय कराल, चिडचीड कराल , भांडण कराल पण शक्ती कपूर मात्र थोडे वेगळे होते. त्यांना मुंबईमध्ये एकदा एका चार चाकी गाडीने धडक दिली.

शक्ती कपूर जाम चिडले पण नंतर त्या गाडीतून जो व्यक्ति उतरला त्या व्यक्तीने शक्ती कपूर यांचा राग संपूर्ण विरगळूनच टाकला. तो व्यक्ति एक सुपरस्टार होता. हा प्रसिद्ध अभिनेता दूसरा – तिसरा कोणी नसून ते फिरोज खान होते. फिरोज खान हे एकदा मर्सडीज मधून फिरत होते. त्या वेळेस शक्ती कपूर यांच्या कडे एक साधी चार चाकी होती. त्यांची ही गाडी फिरोज खान यांच्या गाडीला धडकली गाडीतून एक धिप्पाड आणि सुंदर कलाकार बाहेर आला , तो कलाकर म्हणजे फिरोज खान होय. शक्ती कपूर यांच्या ही गोष्ट लक्षात की हे फिरोज खान आहेत. त्यानी लगेच फिरोज खान यांना संगितले की त्यानी फिल्म इंस्टिट्यूट ऑफ़ पुणे’ येथे.एक्टिंगचा डिप्लोमा केला आहे. शक्ती कपूर हे फिरोज खान यांच्याशी बोलू लागले त्यानी फिरोज खान याना बोलता -बोलता एक विनंती केली की मला एखाद्या चित्रपटात एखादी भूमिका द्या. फिरोज खान काही न बोलता निघून गेले.

शक्ती कपूर देखील त्यांच्या मित्रांच्या घरी निघून गेले. के.के. शुक्ला यांच्या घरी गेले. के. के. शुक्ला हे फिरोज खान यांच्याशी कुर्बानी चित्रपटात काम करत होते. के. के यांनी शक्ती यांना संगितले की फिरोज खान त्यांच्या चित्रपटात एका नवीन पात्राला घेणार आहेत. तो व्यक्ति हा फिरोज खान यांच्या गाडीला धडकला असून त्याने फटीआय मधून अॅक्टिंगचा कोर्स केला आहे. शक्ती कपूर हे आनंदाने उड्या मारू लागले कारण तो व्यक्ति हा शक्ती कपूर हेच होते. शक्ती कपूर यांनी हा किस्सा कपिल शर्मा शो मध्ये संगितला. शक्ती कपूर यांनी आजपर्यंत 700 हूं अधिक चित्रपटात भूमिका केल्या आहेत. शक्ती कपूर हे एक खलनायक म्हणून खूप प्रसिद्ध आहेत. या बरोबरच ते विनोदी भूमिका देखील उत्तम करतात.

Being Marathi

Related articles