तू अजून देखील 18 वर्षांचाच दिसतो .. सलमानच्या पिळदार शरीरावर ही अभिनेत्री झाली फिदा

तू अजून देखील 18 वर्षांचाच दिसतो .. सलमानच्या पिळदार शरीरावर ही अभिनेत्री झाली फिदा

सलमान खान आणि त्याचे चाहते यांच्या एक गोष्टच वेगळी असते. सलमान खान हा तसा विचार केला तर एक एवर ग्रीन अभिनेता आहे. त्यांचा डान्स , त्यांची अॅक्टिंग आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांचे पिळदार शरीर यांची सर्वांनाच भुरळ पडत असते. सलमानला फिटनेसची प्रचंड आवडत आहे. तो सतत व्यायाम करतानाचे फोटो सोशल मध्यमांवर पोस्ट करत असतो.

अगदी काही दिवसांपूर्वीच सलमानने एक व्यायाम करतानाचा फोटो पोस्ट केला त्यामध्ये सलमान प्रचंड भारी दिसत होता. त्यांचे पिळदार आणि चमकणारे शरीर पाहून त्यांच्या चाहत्यांनी कमेन्ट आणि लाईकस यांचा अक्षरक्षा पाऊस पाडला. अनेकांना सलमानच्या या शरीराचा हेवा वाटतो. आता सलमान 50 वर्षांचा आहे पण त्याचे शरीर आणि बॉडी एखाद्या तरुणाला लाजवेल अशीच काही आहे. सलमानचे हे पिळदार शरीर पाहून अभिनेत्री गौहर खान हिला देखील राहवले नाही तिने सलमानच्या फोटोवर एक भन्नाट कमेन्ट केली.

तू अजून देखील 18 वर्षांचा आहेस का ? तूला इतक फिट रहायला कसं जमतं असं गौहरने सलमानला विचारलं आहे. गौहर देखील सलमानची एक मोठी चाहती आहे. तिला स्वताला देखील व्यायामाची प्रचंड आवड आहे. ती सतत वेगवेगळे व्यायाम करतानाचे फोटो आणि विडियो शेयर करत असते. गौहरची ही कमेन्ट पाहून चाहत्यांनी देखील तिला तू सलमानच्या प्रेमात तर पडली नाहीस ना ? असा प्रश्न केला आहे. गौहर ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने क्या कुल है हम या चित्रपटातून बॉलीवुडमध्ये प्रवेश केला होता

Being Marathi

Related articles