‘सुशांतला दर 30-40 मिनिटांनी चहा मधून 4 थेंब हे ड्रग्सचे लिक्विड दे’, असे रियाला म्हणाली हि व्यक्ती

‘सुशांतला दर 30-40 मिनिटांनी चहा मधून 4 थेंब हे ड्रग्सचे लिक्विड दे’, असे रियाला म्हणाली हि व्यक्ती

‘सुशांतला दर 30-40 मिनिटांनी चहा मधून 4 थेंब हे ड्रग्सचे लिक्विड दे’, असे रियाला म्हणाली हि व्यक्ती

बॉलिवूड कलाकारांनी आयुष्य संपवणे हे आता आपल्याकडे नवीन राहिलेले नाही. आवडत्या अभिनेत्याच्या अचानक जाण्याने प्रेक्षक भावूक होतात हे नक्की! बॉलीवुड म्हणलं की प्रसिद्धी, पैसा या गोष्टी अगदी आपसूक येतातच. पण याही पलिकडे जाऊन येतो तो प्रसिद्धीचा हव्यास! रिया चक्रवर्ती आणि सुशांतची प्रेम कहाणी आणि सुशांतने अचानक आयुष्य संपवणे या घटना अर्थात सहज सोप्या नव्हत्या, आणि आता त्यांची क्लिष्टता अजूनच भयानक होत आहे.

१४ जून रोजी सुशांतने आयुष्य संपवले. एक आठवडा आधी ८ जून रोजी त्याची मैत्रीण आणि पी आर ऑफिसर दिशा सलियान हिने १७ व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्याला कायमचे दूर केले. मात्र, या दरम्यान रिया हिने ८ जून रोजी संध्याकाळी सुशांतचे घर सोडले. या सगळ्या घटनाक्रमात आता सीबीआय आणि इडी आपापले काम बजावत आहे. त्यात रिया चक्रवर्ती हिचे महेश भट बरोबर असणारे संबंध, महेश भट याचा तिला सुशांतला सोडायचा सल्ला तिच्या व्हॉटसअप मेसेजेसवरुन स्पष्ट झाले आहे.

आता तिने डिलीट केलेले मेसेज सीबीआयने समोर आणले आहेत. ज्यात तिचे आणि ड्रग डीलर्सचे असणारे संबंध आणि तिने सुशांतसाठी कोणते ड्रग्स असावेत याविषयी केलेली चर्चा आहे. सुशांतला चहा मधून ४ थेंब हे ड्रग्सचे लिक्विड दे असे ड्रग डीलर्स तिला सांगताना हे मेसेज आहेत. ३०-४० मिनिटांनी त्याला हा डोस देत रहा असे देखील त्यात बोलले गेले आहे. श्रुती मोदी, जया सहा, दीपेश सावंत असे अनेक ड्रग डीलर्स तिच्या संपर्कात होते. आता या प्रकरणाला येणारे वेगळे वळण हे अनेक जणांना अडचणीत आणणारे आहे एवढे निश्चित.

यातून काय काय नवे खुलासे होतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. संदीप सिंह जो सुशांतचा मित्र म्हणावतो, तो एरवी मीडिया समोर येऊन प्रसिद्धी मिळवत होता. मात्र, आता त्याला या खूनामागे कटकारस्थाने करणारा मुख्य हात मानलं जातंय, त्याच्यावर आरोपांची फायरिंग होत आहे तेव्हा तो काहीच बोलायला तयार नाहीये.

रियाने आधीच मी कधीही ड्रग्स घेतल्या नाहीत असे उद्गार काढले आहेत. मात्र, तिचे मेसेजेस वेगळेच काही बोलत आहेत. हे सगळं गोंधळात टाकणारं असलं तरी, एम्स रुग्णालयाने दिलेल्या रिपोर्ट्स ने एक स्पष्ट केले आहे की सुशांतने स्वतः आपले आयुष्य संपवले नाही या मागे कोणाचा तरी हात आहे. आता तो हात कोणत्या व्यक्तीचा निघतोय ते आपण सगळे काही दिवसातच जाणू!

Being Marathi

Related articles