महेश भट आणि रिया चक्रवर्तीचे व्हाट्सअँप संभाषण आहे असे काही खास… कि, सुशांतच्या केसमध्ये महेश भट यांचा सहभाग होईल स्पष्ट!

महेश भट आणि रिया चक्रवर्तीचे व्हाट्सअँप संभाषण आहे असे काही खास… कि, सुशांतच्या केसमध्ये महेश भट यांचा सहभाग होईल स्पष्ट!

महेश भट आणि रिया चक्रवर्तीचे व्हाट्सअँप संभाषण आहे असे काही खास… कि, सुशांतच्या केसमध्ये महेश भट यांचा सहभाग होईल स्पष्ट!

१४ जून २०२० हा दिवस, एका उमेदीच्या कलाकाराच्या आयुष्यात शेवटचा क्षण घेऊन आला आणि त्यानेच आपले आयुष्य संपवले, तो नैराश्यात होता, अशा अनेक चर्चांना त्याच्या जाण्याच्या १-२ तासातच उधाण आले. मोठमोठे सेलिब्रिटीज अगदी दीपिकादेखील नैराश्य कसं जीवघेणं ठरू शकतं याचे धडे सोशल मीडियावर देऊ लागली. परस्पर तो नैराश्यात होता हे ठरवून सगळ्यांनी त्याने आत्महत्या केली हे सिद्ध केले.

आणि इथेच त्याच्या वडिलांना संशय येऊ लागला. पाटण्यात त्याच्या जाण्याच्या दिड महिन्यांनी त्यांनी तक्रार दाखल केली आणि ती हि त्याच्या कथित गर्लफ्रेंड आणि फ्लॅटमेंट विरोधात. रिया आणि सिद्धार्थ पिठानी तोपर्यंत त्याच्या चांगल्या स्वभावाची आणि एक चांगला माणूस अशी स्तुती करत होते. सीबीआय चौकशी व्हावी, अशी सुशांतची गर्लफ्रेंड रिया हिने मागणी देखील केली होती. जेव्हा सुशांतचे वडील के के सिंह यांनी तक्रार दाखल केली. तेव्हा, त्यात १५ कोटीचा गैरव्यवहार झाला आहे, ते १५ कोटी सुशांतच्या खात्यातून कुठे वर्ग झाले, रियाची लाईफ स्टाईल अचानक सुशांतच्या संपर्कात आल्यावर इतकी कशी बदलून गेली, तिची कमाई आणि तिचे खर्च याचा ताळमेळ का नाहीये असे अनेक प्रश्न समोर आले.

ईडीची चौकशी तिच्यावर लागली. त्या आधी महेश भट यांची चौकशी मुंबई पोलिसांनी केली. त्यांनी रियाला सुशांत डिप्रेशनमध्ये असून परवीन बाबीच्या मार्गावर आहे असे सांगितले होते. हे त्यांनी सुशांत गेल्यावर मान्य केले आणि चौकशीत नाकारले. मी त्यांच्यामध्ये का येऊ? रिया मला मुलीसारखी आहे. मी तिला सुशांतला सोडण्याचा सल्ला नव्हता दिला. असे ते चौकशीत म्हणाले. सुराहीता दास या महेश भट यांच्या मॅनेजरने मात्र एक घोळ घालून ठेवला.

सुशांत गेल्याचे १२-१२:३० वाजता १४ जूनला समोर आले. तोपर्यंत त्याच्या रूमचे दार उघडण्यासाठी चावीवाला शोधणे सुरु होते. मात्र, सुराहीताने १०:३० वाजता सुशांत साठी आरआयपी असे टाकून, रियाला तिने सुशांतला किती साथ दिली, ती किती त्रासातून गेली, कशी ती ऑफिसला धावत पळत भट साहेबांकडून कौन्सेलिंग साठी यायची, वगैरे वगैरे लिहिले. आणि हे हि लिहिले, “शेवटच्या भेटीत भट साहेबांनी गच्चीत बसल्यावर सुशांतच्या घरी त्याला पाहून ओळखले होते कि तो निसटत चालला आहे. अगदी परवीन बाबीसारखा, ते तिला बोलले तरी तू जमेल तेवढा वेळ त्याच्यासोबत घालवलास.”

हि पोस्ट आता वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे. आणि रियाने महेश भट यांना केलेले मेसेज आणि त्यांचा रिप्लाय देखील व्हायरल झाला आहे. हा मेसेज ८ जून नंतरचा आहे जेव्हा तिने सुशांतचे घर सोडले होते. सुशांतचे घर सोडल्यानंतर तिने लगेचच महेश भट्ट यांना मेसेज पाठवला होता. ‘आयशाने आता एक पाऊल पुढे टाकलं आहे. तुमच्यासोबत झालेल्या शेवटच्या संभाषणाने माझे डोळे उघडले. तुम्ही माझे देवदूत आहात. तुम्ही तेव्हाही होते आणि अजूनही आहात’, असं रियाने म्हटलं आहे.

यावर महेश भट्ट यांनी दिलेली प्रतिक्रिया आणि पोलिसांसमोरचे त्यांचे विधान यात जमीन अस्मानाचा फरक आहे. त्यांचे विधान पुढीलप्रमाणे आहे, ‘आता मागे वळून पाहू नको. जे संभव आहे ते साध्य करून दाखव. तुझ्या या निर्णयामुळे तुझे वडील खूश होतील.’ यावरून अभिनेत्रीचे वडीलही या नात्यावर खूश नव्हते, असं स्पष्ट होत आहे. आणि महेश यांचा तिच्यावरील प्रभाव आणि तिच्या व सुशांतच्या नात्यातील त्यांचा हस्तक्षेप देखील सिद्ध होत आहे. दरम्यान ईडीच्या चौकशीत रिया आणि तिच्या कुटुंबियांना अनेक प्रश्नांची उत्तरे देता आलेली नाहीत. त्यात सुप्रीम कोर्टाने हि केस रियाची याचिका फेटाळत सीबीआयला दिली आहे. त्यामुळे, आता तिला याचे काय काय परिणाम भोगावे लागतील हे या तपासाच्या शेवटी कळेलच!

Being Marathi

Related articles