कधी काळी रिपोर्टर म्हणून काम करणारी बाँलिवुडमधील ‘ही’ हाँट अभिनेत्री आज आहे मोठी बॉलिवूड स्टार…

वृत्तपत्रे किंवा प्रसार माध्यमे हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले जातो. पूर्वी आपल्या लेखणीद्वारे जनमानसाला जागरुक ठेवण्याचे कार्य प्रसारमाध्यमे करत असत मात्र सध्या वृत्तवाहिन्यांचे जग असल्यामुळे या क्षेत्राला काहीसे ग्लॅमर प्राप्त झाले आहे. वृत्तवाहिन्या द्वारे अँकरच्या रूपात अनेक आकर्षक चेहरे समोर येत आहेत यांपैकी काही आकर्षक चेहरे हे अक्षरशः मॉडेल किंवा अभिनेत्रींनासुद्धा झाकोळून टाकू शकतात.
आज आपण अशाच एका न्युज रिपोर्टर बद्दल जाणून घेणार आहोत जीची सुरुवात ही एका श्रीलंकेतील वृत्तवाहिनी तील रिपोर्टर म्हणून झाली व सध्याची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून आता ती ओळखली जाते. ही अभिनेत्री म्हणजेच आपल्या फिटनेस आणि नृत्याने सगळ्यांचे मन जिंकून घेणारी व नुकत्याच आलेल्या बादशाह सोबतच्या गेंदा फूल या अल्बम मुळे प्रकाश झोतात आलेली अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस होय. जॅकलीन ची सुरुवात ही श्रीलंकेतील एका वृत्त समूहासाठी रिपोर्टिंगचे काम करण्यापासून झाली. तिचा एका वृत्तवाहिनीची रिपोर्टर ते बॉलीवूड मधील प्रथितयश अभिनेत्री म्हणून झालेला प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत.
श्रीलंकेची असलेली जॅकलीन फर्नांडिस हिचा जन्म हा एका बहुवांशिक अशा कुटुंबांमध्ये झाला. जॅकलिन चा सुरुवातीपासून अभिनय क्षेत्रामध्ये येण्याचा कोणत्याही प्रकारचा मानस नव्हता. तिचे आपल्या शिक्षणाप्रती प्रचंड प्रेम होते व यातूनच सिडने येथील विद्यापीठामधून तिने मास कम्युनिकेशन स्टडीज मध्ये पदवी धारण केली व पुन्हा श्रीलंकेमध्ये येऊन तेथे एका वृत्तवाहिनी साठी रिपोर्टिंगचे काम ती करू लागली.
मात्र हे रिपोर्टिंगचे काम करत असताना तिला मॉडेलिंग मध्ये रस निर्माण झाला व २००६ साली जॅकलीनने मिस श्रीलंका या मान च्या सौंदर्य स्पर्धेमध्ये भाग घेतला व या मध्ये पहिल्याच प्रयत्नात ती यशस्वी ठरली. मिस युनिव्हर्स स्पर्धेमध्ये विश्व स्तरावर जॅकलीने ने मिस. श्रीलंका म्हणून आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले. यातूनच तिला मॉडेलिंगच्या अनेक ऑफर्स येऊ लागल्या.

अशाच एका मॉडेलिंगच्या असाइन्मेंट वर काम करण्यासाठी ती भारतामध्ये आली असताना सुजॉय घोष निर्माण करत असलेल्या आलादिन या रितेश देशमुखची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटासाठी तिने प्रमुख भूमिकेसाठी ऑडिशन दिली व या भूमिकेसाठी तिची निवड झाली. तिथूनच तिला तिच्या अभिनयक्षेत्रातील पदार्पणाची संधी मिळाली.या चिय्रपटातील तिच्या अभिनयावर समिक्षकांनी खूप टीका केली.यानंतर जँकलीनला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारा मर्डर टू हा चित्रपट मिळाला .या चित्रपटातील तिच्या बोल्ड अँड ब्युटीफूल लुक्स वर चाहते फिदा झाले व त्यानंतर तिने कधी मागे वळून पाहिलेच नाही.
जॅकलीनला पुढील काळात हाउसफुल टू ,किक ,रेस टू यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. तिचे चित्रपट बॉक्स ऑफिस वर कमाईच्या दृष्टीने चांगले यशस्वी ठरले असले तरीही वैयक्तिक पणे तिच्या अभिनयाबद्दल तिला संमिश्र अशा प्रतिक्रिया समीक्षकांकडून नेहमीच मिळत आल्या आहेत.
जॅकलीन ला सुंदर अभिनेत्रींमध्ये गणले जाते मात्र तिच्या अभिनयाबद्दल नेहमीच साशंकता घेतली जाते. जॅकलीन च्या नृत्यकौशल्य बाबत मात्र कोणतेही दुमत नाही .जॅकलिन आघाडीच्या नृत्यांगना मध्ये एक गणली जाते व यामुळे तिला झलक दिखला जा’च्या एका पर्वामध्ये परीक्षक म्हणून काम करण्याची संधी सुद्धा मिळाली होती.