शुटिंग ला जातेवेळी भाच्याने सांगितले असे काही, ऐकून कंगनाच्या डोळ्यांत आले पाणी

बाँलिवुडमध्ये काही प्रसिद्ध अभिनेत्री आपल्या अभिनय, सौंदर्य व चित्रपटांपेक्षा सुद्धा त्यांच्या सोशल मीडियावरील व प्रसारमाध्यमांसमोरील बेताल वक्तव्यामुळे व बिनधास्त स्वभावामुळे जास्त प्रसिद्ध असतात. या स्वभावामुळे अनेकदा त्या विवादांमध्ये सुद्धा अडकतात. सध्या नेपोटीझम आणि एकंदरीतच बॉलिवूडमधील घराणेशाही च्या विरोधात अगदी सगळी शस्त्रे एकवटून रिंगणात उतरलेली अभिनेत्री म्हणजे कंगना राणावत होय.
कंगना राणावत ने बॉलीवूड मधील सर्व टॉपच्या दिग्दर्शक, निर्माते ,अभिनेते व अभिनेत्री यांवर आपल्या वक्तव्याने हल्ला चढवला आहे.या वादामध्ये तिने महाराष्ट्र सरकारला सुद्धा ओढले आहे .अशा प्रकारची वक्तव्य करताना कंगना राणावत मागे पुढे पाहत नाही व आपल्यावर केल्या गेलेल्या आरोपांचा सुद्धा आक्रमकपणे समाचार घेताना दिसते .
अशी बिनधास्त, स्पष्ट व्यक्ती प्रतिमा बनलेल्या कंगनाचा वैयक्तिक आयुष्यातील मृदू आणि हळवा स्वभावही कधीकधी सोशल मीडियावर प्रतीत झालेला दिसून येतो. कंगना राणावत ही आपल्या कुटुंबाशी खूपच जोडली गेलेली आहे. आपल्या कुटुंबाला ती प्रथम प्राधान्य देतांना दिसून येते. नुकतेच कंगना च्या भावाचे लग्न धुमधडाक्यात पार पडले. त्यावेळी तिच्या सर्व नातेवाईकांसोबत तिने घालवलेले क्षण प्रसारमाध्यमांनी दाखवले.
छायाचित्रांमध्ये आपल्या कुटुंबीयांसोबत अगदी वेगळ्याच रुपात कंगना दिसली. आपल्या बहिणीप्रमाणे भाच्यासोबतही तिचे घट्ट असे संबंध आहेत. कंगनाची बहीण रंगोली ही नेहमी तिच्या पाठीशी अगदी भक्कमपणे उभी राहिलेली दिसून येते. रंगोलीचा मुलगा पृथ्वीराज याच्यावर कंगनाचा खूप जीव आहे व ती नेहमी त्याच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
नुकतेच कंगनाचे पृथ्वीराज सोबतचे छायाचित्र सोशल मीडियावर अपलोड केले व त्याच्या कॅप्शनमध्ये तिने अगदी भावनिक अशी पोस्ट लिहिली. ती म्हणते की ज्यावेळी मी शूटिंगसाठी निघाले त्यावेळी त्याने मला न जाण्याचा हट्ट केला. त्यावर मी त्याला मला काम करावेच लागेल असे सांगितले.तेव्हा थोडा वेळ तो काहीसा विचारात पडला व त्याने अगदी समजूतदारपणे मला सांगितले की तू शूटिंग ला जा पण निदान त्या अगोदर दोन मिनिटे तरी माझ्याजवळ बस.
त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर असलेले हावभाव आत्तासुद्धा माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू आणतात.यावरून कंगनाची आपल्या कुटुंबासोबत वीण किती घट्ट आहे ते दिसून येते.सध्या जयललिता यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटामध्ये कंगना प्रमुख भूमिकेत आहे व या चित्रपटाच्या चित्रीकरणाला मध्ये ती व्यस्त असून लवकरच तिच्या धाकड या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुद्धा ती सुरुवात करणार आहे.