करिष्मा कपूरची मुलगी आहे इतकी सुंदर , लवकरच करणार बाँलिवुडमध्ये पदार्पण, फोटो बघण्यासाठी क्लिक करा

करिष्मा कपूरची मुलगी आहे इतकी सुंदर , लवकरच करणार बाँलिवुडमध्ये पदार्पण, फोटो बघण्यासाठी क्लिक करा

ऐंशीच्या दशकामध्ये प्रसिद्ध असलेली अभिनेत्री करिश्मा कपूर सध्या चित्रपटक्षेत्रा पासून दूर असली तरीही आपल्या सौंदर्य आणि फिटनेससाठी आज सुद्धा खूप चर्चेत असते. निळेशार डोळे,आरस्पानी सौंदर्य,उत्क्रुष्ट अभिनय आणि न्रुत्य यांच्या जोरावर करिश्माने  स्वतःची अशी एक ओळख चित्रपट क्षेत्रात निर्माण केली होती.

बॉलीवूडमधील प्रथितयश  घराण्यातल्या कपूर घराण्यातील मुलगी असूनही सुरुवातीच्या काळामध्ये करिष्माने प्रचंड संघर्ष केला होता. करिष्माने अभिनय केलेला राजा हिंदुस्थानी, दिल तो पागल है यांसारख्या ब्लॉकबस्टर सुपरहिट चित्रपटांना आजसुद्धा चाहत्यांकडून तितक्याच आवडीने पाहिले जाते.

करिश्माचा चित्रपटांप्रमाणे  वैयक्तिक आयुष्य सुद्धा चर्चिले जात असे. करिष्मा कपूरचे सुरुवातीला अभिषेक बच्चन सोबत प्रेम संबंध होते व त्याच्या सोबत तिचा साखरपुडा सुद्धा झाला होता मात्र काही कारणास्तव हे नाते संपुष्टात आले. त्यानंतर करिष्माने दिल्लीच्या एका उद्योगपती संजय कपूर यांच्याशी विवाह केला व त्यांच्यापासून तिला दोन मुले सुद्धा आहेत.

संजय सोबत फार काळ तिचे संबंध चांगले राहू शकले नाही व काही काळानंतर ती त्याच्यापासून विभक्त राहू लागली.करिश्माची मुलगी समायरा व मुलगा कियान हे सुद्धा तिच्यासोबतच मुंबई मध्ये राहतात. सध्या करिष्मा सोबतच तिची मुलगी समायरा हीसुद्धा प्रसारमाध्यमांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

समायरा सुद्धा आपल्या आईप्रमाणेच खूप सुंदर आणि स्टायलिश राहते व लवकरच ती सुद्धा अभिनय क्षेत्रामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. सोशल मीडियावर नेहमीच समायराचे आकर्षक छायाचित्रे व्हायरल होत असतात. 19 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये तिने आपल्या या चित्रपटाची एन्ट्री दाखल केली होती.

या चित्रपट महोत्सवांमध्ये दाखवला गेलेल्या बी हँपी  या चित्रपटाचे दिग्दर्शन समायराने केले होते. तिला अभिनयासोबतच कलादिग्दर्शकाची पण दृष्टी आहे. कपूर घराण्याचा अभिनयाचा वारसा तिला जणू काही जन्मतःच मिळाला आहे. आपल्या मुलीला तिचे करिअर ज्या क्षेत्रामध्ये करायचे आहे त्याला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे करिश्माने सांगितले आहे.

beingmarathi

Related articles