बोल्ड सिन, किसिंग सिन असलेल्या चित्रपटाला थेट रिजेक्ट करून ‘ही’ अभिनेत्री करते प्रेक्षकांच्या मनावर राज, दिसतेय खूपच सुंदर, पहा फोटो..

बाँलिवुड प्रमाणेच दक्षिण भारतीय चित्रपटांचा सुद्धा चाहता वर्ग मोठा आहे. दक्षिण भारतीय चित्रपटांमधील कथानक आणि अभिनेते-अभिनेत्री यांचे संपूर्ण जगभरात चाहते पसरलेले आहेत. हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये दक्षिण भारतीय चित्रपटांचे रीमेक अगदी सर्रास केले जातात.दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये सुद्धा कथानकाची गरज म्हणून अभिनेत्रींनी अंग प्रदर्शन करणे ,चुंबन दृश्य देणे किंवा बोल्ड सीन्स देणे यांचा भडीमार केला जातो.

कथानकाची गरज म्हणून व आपल्याला अधिकाधिक चांगल्या संधी मिळाव्यात यासाठी अभिनेत्रीसुद्धा असे बोल्ड सीन देण्यास मागे पुढे पाहत नाही. मात्र या सर्वांमध्ये सुद्धा आपल्या साधेपणा व अंगप्रदर्शन न करता केवळ अभिनयाच्या आधारे प्रेक्षकांची मने जिंकून घेणारी सुद्धा एक अभिनेत्री दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टी मध्ये आहे व सध्या ती अनेक चाहत्यांच्या हृदयावर राज्य करत आहे ती अभिनेत्री. म्हणजे कीर्ती सुरेश होय.

कीर्ती सुरेश दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीतील एक आघाडीची व लोकप्रिय अभिनेत्री असून तिने मल्याळम तेलुगु व तमिळ अशा भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे. कीर्ती सुरेशची खासियत म्हणजे कीर्तीने आजपर्यंत एका सुद्धा चित्रपटांमध्ये बोल्ड सीन दिला नसून अंगप्रदर्शन सुद्धा केले नाही. वैयक्तिक आयुष्य मध्येसुद्धा किर्ती हि अतिशय साध्या राहणी मध्ये दिसून येते. तिच्या साधेपणातील सौंदर्या वरच चाहते फिदा आहेत.

किर्तीला कोणत्याही चित्रपटाचा करार साईन करताना कीर्ती या करारामध्ये कोणत्याही प्रकारची चुंबनद्रुश्य, अंगप्रदर्शन किंवा बोल्ड सीन देणार नसल्याचे आधी लिहून घेते। कीर्ती अगदी लहानपणापासूनच दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये अभिनय करत आली आहे. तिला फिल्मी वारसा जन्मतः लाभला आहे. तिचे वडील जी सुरेश आणि आई मेनका हे चित्रपटसृष्टीशी निगडित आहे.

तिच्या आई या तमिळ अभिनेत्री आहेत तर वडील प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत यामुळे तिने आपल्या वडिलांच्या पायलट सारख्या चित्रपटांमध्ये बालकलाकाराची भूमिका केली होती. मधल्या काळामध्ये आपल्या शिक्षणावर तिने लक्ष केंद्रित केले व फॅशन डिझायनिंग चा अभ्यासक्रम पूर्ण केला. कीर्तीला फॅशन डिझायनिंग मध्ये सुद्धा खूप रस असून या करियर वर सुद्धा ती आपले लक्ष भविष्यात केंद्रित करणार आहे.

फॅशन डिझायनिंगचा कोर्स झाल्यानंतर कीर्तीने गीतांजली या प्रियदर्शन दिग्दर्शित चित्रपटांमध्ये दुहेरी भूमिका साकारली होती. या चित्रपटाला संमिश्र अशा प्रतिक्रिया मिळाल्या मात्र त्यानंतर कीर्तीने दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीतील जवळपास सर्वच आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम केले व कोणतेही अंग प्रदर्शन न करता केवळ अभिनयाच्या जोरावर आपले स्थान या इंडस्ट्रीमध्ये निर्माण केले.
ती केवळ दिसायला सुंदर नसून तिचा अभिनय सुद्धा तितकाच उत्कृष्ट आहे. म्हणूनच महानती या चित्रपटातील सावित्रीच्या भूमिकेसाठी कीर्तीला त्या वर्षीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.