दक्षिणात्य अभिनेता यश याच्या के जीएफ चाप्टर वन या चित्रपटाला संपूर्ण जगभरामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर केजीएफ चॅप्टर टू हा चित्रपट सुद्धा प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शना बाबत चाहत्यां मध्ये खूपच उत्सुकता आहे. के जीएफ चाप्टर टू या चित्रपटाचे टीजर हे यश या चित्रपटातील प्रमुख अभिनेत्याच्या वाढदिवसाच्या दिवशी रिलीज केले जाईल असे या चित्रपटाचे निर्माता दिग्दर्शक कार्तिक गौडा यांनी ट्विटर द्वारे एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना नुकतेच सांगितले आहे.

8 जानेवारीला यशचा वाढदिवस असतो व याच दिवशी के जीएफ चाप्टर टू चा टीजर  रिलीज होणार आहे .हा टीजर म्हणजे एका वेगळ्याच उंचीवर चित्रपटाला नेऊन ठेवणारा अनुभव असेल असे कार्तिक ने सांगितले .सुमारे तीन वर्षांपूर्वी के जी एफ चॅप्टर वन हा चित्रपट येऊन गेला त्यानंतर या चित्रपटाच्या सिक्वेलची उत्सुकता ही अजून सुद्धा चाहत्यांमध्ये आहे.

कोरोनाव्हायरस च्या संक्रमणामुळे लॉक डाऊन जारी झाले व लाँकडाउनच्या  काळामध्ये के जी एफ चॅप्टर टू चे शूटिंग पूर्णपणे बंद झाले. ऑगस्ट महिन्यामध्ये पुन्हा एकदा के जीएफ चाप्टर टू च्या चित्रीकरणास नव्याने सुरुवात झाली. या चित्रपटामध्ये रविना टंडन आणि संजय दत्त या अभिनेत्यांच्या ही दमदार व प्रमुख भूमिका आहेत. नुकतेच या चित्रपटातील संजय दत्तचा लुकसुद्धा चाहत्यांसाठी शेअर करण्यात आला होता. या चित्रपटामध्ये संजय दत्त एका खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

चित्रपटाच्या निर्मात्यांनी चाहत्यांशी संवाद साधताना असे सांगितले की के जी एफ चॅप्टर वन या चित्रपटाची निर्मिती करताना या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल काहीशी साशंकता होती त्यामुळे या चित्रपटाच्या सादरीकरणावर बऱ्याच मर्यादा आल्या होत्या मात्र या चित्रपटांमध्ये अशा प्रकारची कोणतीही कमतरता राहू दिली जाणार नाही व हा प्रेक्षकांसाठी अजून चांगल्या प्रकारचा अनुभव कसा बनेल यासाठी प्रयत्न केल्याचेही त्यांनी सांगितले.