ब्रेकअप करायला भेटले आणि विसरून गेले, आता आहेत 35 वर्षांपासून विवाहित! जाणून घ्या जावेद अख्तर आणि शबाना यांची लव स्टोरी

ब्रेकअप करायला भेटले आणि विसरून गेले, आता आहेत 35 वर्षांपासून विवाहित! जाणून घ्या जावेद अख्तर आणि शबाना यांची लव स्टोरी

ब्रेकअप करायला भेटले आणि विसरून गेले, आता आहेत 35 वर्षांपासून विवाहित! जाणून घ्या जावेद अख्तर आणि शबाना यांची लव स्टोरी

जावेद अख्तर म्हणजे एक नावाजलेले आणि खरं तर एकमेव नावाजलेले आणि आजही नाव आणि प्रसिद्धी असणारे ७० च्या दशकातील लेखक. शबाना आजमी ही एक अशी अभिनेत्री, जिने सावळा रंग सुद्धा किती नशिला आणि मादक असू शकतो हे चित्रपटात साडीत जास्त काळ राहून सिद्ध केले. शबाना हिचे वडील तिला उर्दू शिकवण्यासाठी उत्सुक होते. मग आता तिला शिकवणार कोण? तर त्यांनी जावेद अख्तर यांना तशी विनंती केली. त्यांनी विनंती मान्य केली. आणि ते शबानाला उर्दूचे उच्चार स्पष्ट करण्यासाठी मदत करू लागले.

जावेद अख्तर यांची प्रसिद्धी खूप ऐकलेली असल्याने शबाना सुध्दा उत्सुक होती. जावेद यांचे हनी इराणी यांच्याशी लग्न झालेले, त्यांना दोन मुलं! त्यामुळे जावेद एक शिक्षक म्हणून आपली जबाबदारी पार पाडत होते. शबानासुद्धा त्यांच्याकडे एक विवाहित म्हणून पाहत होती. जावेद तिच्या नाजुक आणि सुंदर दिसण्यावर कधीच भाळले होते. पण आपण लग्न केले आहे ही बाब त्यांच्या मनात घर करून होती. शबानासुद्धा त्यांच्याकडे काही काळाने आकर्षली जाऊ लागली. परंतु त्यांनी दूरच राहायचे ठरवले.

हनी इराणी यांना आपला नवरा भरकटला आहे हे कळत होतेच. त्यांना शबाना विषयी जावेद बोलले तेव्हा, त्यांनी १९७८ मध्ये जावेद यांना सोडचिठ्ठी दिली. जावेद अख्तर यांना सोडून त्या वेगळ्या झाल्या. मात्र झोया आणि फरहान यांना त्यांनी वडिलांबद्दल कधीच वाईट सांगितले नाही.

त्या एका मुलाखतीत म्हणाल्या, ” त्यांचे त्यांच्या वडिलांशी नाते आणि तिच्याशी नाते छान आहे. वडिलांचे आणि त्यांचे नाते बिघडले नाही हे खूप छान झाले. मी जावेदच्या वाढदिवसाला त्यांच्या घरी जाते. जावेद मुलांना भेटायला येत असत आणि आजही येतात. मी आणि शबाना एकमेकींना हाय बाय बोलतो पण आम्ही मैत्रिणी नाहीत. आणि ते शक्य नाही.”

शबाना यांनी आपल्या प्रेमाचा किस्सा सांगताना असे बोलले होते की, “आमचे अरेंज मॅरेज व्हावे इतकी घरची परिस्थिती सारखी होती. केवळ जावेद यांचे पाहिले लग्न म्हणून आम्ही ब्रेकअप करायचे असे ठरवले. एका वर्षात वेगळे होऊ असे बोलायला आम्ही एका ठिकाणी भेटलो. पण आम्ही एकमेकांना पाहून गप्पा इतक्या मारल्या की, गप्पांमध्ये आम्ही काय बोलायला आलो तेच विसरलो. घरी जाऊन याची जाणीव झाली की आपण वेगळे नाही होऊ शकत.” त्याच वेळी त्यांनी असे ठरवले की, लग्न करूयात. १९८४ मध्ये त्यांनी मुस्लिम पद्धतीने लग्न केले. बॉलीवुड मधील प्रसिद्ध लव्ह स्टोरी म्हणून ही गोष्ट अतिशय प्रसिद्ध आहे. आजही दोघे एकत्र आहेत.

Being Marathi

Related articles