अभिनेत्री महिमा चौधरीची मुलगी दिसतेय इतकी सुंदर आणि ग्लॅमरस, की दिग्गज अभिनेत्री देखील पडतील तिच्यासमोर फिक्या…!

काही अभिनेते व अभिनेत्री आपल्या चित्रपटांमध्ये ब्लॉकबस्टर हिट पिक्चर देऊन सुपरस्टार बनतात मात्र नंतर त्यांना त्यांच्या यशाचा आलेख चढता ठेवणे किंवा टिकवून ठेवणे साध्य होत नाही. चित्रपट अगदी मोठ्या निर्माता व दिग्दर्शक सोबत , आघाडीच्या कलाकारांसोबत मिळणे हे सर्व समीकरण जुळून येणे म्हणजे अगदी नशीबवानच म्हटले पाहिजे. हेच भाग्य लाभले होते 90 च्या दशकातील सुपरहिट चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या महिमा चौधरी ला.
महिमा चौधरी परदेस या चित्रपटाद्वारे रातोरात स्टार झाली होती. या चित्रपटामध्ये कोणतेही अंग प्रदर्शन न करता किंवा बोल्ड सीन न देता साध्यासुध्या गावाकडच्या गंगाच्या रूपात महिमा चौधरी खूपच भावली होती. त्यानंतर काही बिग बँनरसोबत तिने काम केले व तिची दखल घेतली गेली. मात्र काही काळानंतर चित्रपट मिळाले नाही व तीने वैयक्तिक आयुष्यामध्ये विवाह करून स्थिर होण्याचा निर्णय घेतला.
2006 मध्ये महिमा ने बाँबी चौधरी यांच्या सोबत विवाह केला. या दोघांना एक कन्यारत्न झाले .महिमाच्या मुलीचे नाव आर्याना आहे व सर्व काही सुरळीत चालले असतांना 2013 झाली महिमा आणि बॉबी विभक्त झाले त्यानंतर आर्याना ही महिमा सोबतच राहते व एक सिंगल मदर म्हणून महिमा आपल्या मुलीची खूप व्यवस्थित देखभाल करत आहे. परदेस सारख्या चित्रपटांमध्ये सुभाष घई यांनी महिमा ला लॉन्च केले होते व यामध्ये तिच्यासोबत शाहरुख खान सारखा बॉलिवूडचा किंग अभिनेता प्रमुख भूमिकेमध्ये होता.
अमरीश पुरी ,आलोकनाथ या कलाकारांच्या सुद्धा या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका होत्या.यानंतर लज्जा, दाग द फायर ,खिलाडी420, ओम जय जगदीश यांसारख्या चित्रपटांमध्ये महिमा दिसली मात्र यामध्ये फारच थोडे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरू शकले.

सध्या महिमा जास्तीत जास्त वेळ आपल्या मुलीसोबत घालवताना दिसते. महिमाची मुलगी आर्याना ही खूपच सुंदर असून ती सुद्धा आपल्या आईच्या पावलावर पाऊल टाकून मोठेपणी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे तिने सांगितले मात्र सध्या ती आपल्या शिक्षणावरच लक्ष केंद्रित करणार आहे.