‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने एकाच व्यक्तीसोबत केला चक्क तीन वेळा विवाह,नाव ऐकून चकित व्हाल…!

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने एकाच व्यक्तीसोबत केला चक्क तीन वेळा विवाह,नाव ऐकून चकित व्हाल…!

बॉलीवूड मधील अभिनेते आणि अभिनेत्री यांचे नातेसंबंध अतिशय किचकट स्वरूपाचे असतात. आज घडीच्या नायक आणि नायिकां मध्ये चित्रीकरण सुरू झाले की प्रेमसंबंध निर्माण होतात आणि चित्रपटाच्या प्रमोशन नंतर हे प्रेमसंबंध संपुष्टात सुद्धा येतात तसेच काही विवाहित नायक नायिकांचे सुद्धा थोड्याच कालावधीमध्ये घटस्फोट होऊन ते विभक्त सुद्धा होतात. 80 90 च्या दशकामध्ये सुद्धा नायक-नायिका यांचे प्रेमसंबंध हे चाहत्यांसाठी कुतूहलाचा विषय होते. त्याकाळी प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडिया इतके सक्रिय नव्हते मात्र तरीही या चर्चा नेहमीच खमंगपणे चर्चिल्या जात असत.

एका नातेसंबंधांमध्ये एका जोडीदारासोबत दीर्घकाळ साथ निभावू न शकणाऱ्या या क्षेत्रामध्ये एकाच व्यक्तीसोबत एका अभिनेत्रीने तीन वेळा विवाह केला आहे ही गोष्ट ऐकल्यावर नक्कीच आपण चकित व्हाल. ही अभिनेत्री कोण आहे याची उत्सुकता सुद्धा तुम्हाला वाटेल. ही अभिनेत्री म्हणजे माला सिन्हा होय.माला सिन्हा या भारतीय नेपाळी वंशाच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने चिदंबर प्रसाद लोहानी या नेपाळी चित्रपटामध्ये काम करणाऱ्या अभिनेत्यासोबत तीन वेळा वेगवेगळ्या पद्धतीने विवाह केला व हा विवाह निभावला सुद्धा.

1936 साली नेपाळमधून भारतामध्ये स्थलांतरित झालेल्या कुटुंबात माला सिन्हा अर्थातच अलदा सिन्हा यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव अलदा होते जे त्यांनी रंगभूमीवर प्रवेश केल्यानंतर बदलून माल सिन्हा असे केले. माला सिन्हा यांनी मुख्यत्वे बंगाली ,नेपाळी आणि हिंदी भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले. माला सिन्हा या 1950 च्या दशकापासून जवळपास चार दशके सलग चित्रपट सृष्टी मध्ये कार्यरत होत्या.सुरुवातीला प्रादेशिक भाषांमध्ये काम केलेल्या माला सिन्हा यांना खरी ओळख मिळाली ते गुरुदत्त यांच्या प्यासा या चित्रपटामुळे. आणि  धुल के फुल चित्रपटामुळे होय. माला सिन्हा यांनी जवळपास शंभर पेक्षाही अधिक चित्रपटांमध्ये काम केले.

 माला सिन्हा या प्रत्येक भूमिका एका वेगळ्याच वास्तववादी उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांच्या संपूर्ण अभिनय कारकिर्दीमध्ये अनेक पुरस्कारही त्यांना मिळाले. यांचा जन्म नेपाली ख्रिश्चन कुटुंबामध्ये झाला. नेपाळमध्ये वसलेले त्यांचे कुटुंब माला सिन्हा यांच्या लहानपणी कलकत्त्यामध्ये स्थलांतरित झाले. माला सिन्हा यांचा आवाज खूपच गोड होता व या आवाजाच्या जोरावर त्यांनी ऑल इंडिया रेडिओ मध्ये काम केले होते.ऑल इंडिया रेडिओ साठी गायनाचे काम करत असताना मुंबई मध्ये जाऊन चित्रपट सृष्टीत अभिनयामध्ये आपले नशीब आजमावण्याचा सल्ला अनेक दिग्गजांनी माला सिन्हा यांना दिला. त्याप्रमाणे माला सिन्हा आपल्या वडिलांसोबत मुंबईमध्ये दाखलही झाल्या. मात्र सुरुवातीच्या काळात त्यांच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिसण्यामुळे त्यांना काही भूमिका नाकारल्या गेल्या मात्र त्यानंतर त्यांच्या काळातील सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी त्या एक बनल्या.

वैयक्तिक आयुष्य आणि करिअर या दोन्हींची उत्तम सांगड माला सिन्हा यांनी घातली होती. माला सिन्हा यांनी एका नेपाळी चित्रपटांमध्ये काम करत असताना त्या आपल्या सहकलाकार चिदंबरम प्रसाद लोहानी यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्या मात्र त्यांचे वडील ख्रिश्चन नेपाळी असल्यामुळे त्यांनी सुरुवातीला रजिस्टर पद्धतीने लग्न केले व त्यानंतर अनुक्रमे ख्रिश्चन पद्धतीने आणि नेपाळी पद्धतीने अशा तीन प्रकारे तीन वेळा त्या आपल्या पतीसमवेत विवाहबद्ध झाल्या. या तीन विवाहांची चर्चा त्याकाळीसुद्धा खूपच रंगली होती.

माला सिन्हा यांच्या पतीचा रियल इस्टेटचा व्यवसाय होता त्यामुळे लग्नानंतरही माला सिन्हा यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला रामराम ठोकला नाहीये तर त्या मुंबईमध्ये येऊन चित्रपटांमध्ये अभिनय करत होत्या आणि त्यांचे पती नेपाळमध्ये आपल्या रिअल इस्टेट बिजनेसला सांभाळत होते. काही काळानंतर त्यांना मुलगी झाली ही मुलगी म्हणजेच बॉलिवूडमधील अभिनेत्री प्रतिभा सिन्हा होय. प्रतिभा सिन्हा यांना आपल्या आईइतके यश मिळाले नाही. उतार वयामध्ये माला सिन्हा आपल्या पती आणि मुलीसमवेत मुंबईमध्ये स्थायिक झाल्या.

माला सिन्हा यांनी बालकलाकार म्हणून सुद्धा स्थानिक चित्रपटांमध्ये अभिनय केला होता आणि रंगभूमीवर त्यांनी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक यशस्वी अभिनेत्यांसोबत उत्तम दर्जाचा अभिनय करून स्वतःची स्वतंत्र ओळख बनवलेल्या माला सिन्हा ह्यांनी आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सुद्धा तितक्याच ताकदीने निभावल्या. त्यांच्या अभिनय कारकिर्दीत मधील योगदानाला स्मरून त्यांना दादासाहेब फाळके लाइफ टाइम अचीव्हमेंट अवॉर्ड सुद्धा देण्यात आला होता.

beingmarathi

Related articles