नवऱ्याला सोडून, चक्क आपल्या मुलाच्या वयाच्या अभिनेत्याला डेट करते आहे ‘ही’ प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री

बाँलिवुडमधील चित्रपट तारे तारकांचे वैयक्तिक आयुष्य हे अनेक चढउतारांनी भरलेले असते.सेलिब्रिटींचे नाते संबंध म्हणजे प्रचंड गुंतागुंत असते.गेल्या काही वर्षांमध्ये बॉलिवुडमधील आदर्श जोडपे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काही जोडप्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला व त्यांच्या चाहत्यांच्या भुवया उंचावल्या.
अगदी आयडियल कपल म्हणून ओळखली जाणारी ही जोडपी का वेगळी झाली हा त्यांच्या चाहत्यांना सतावणारा प्रश्न आहे. चाहत्यांकडून प्रचंड प्रेम मिळालेली एक जोडी म्हणजे मलायका अरोरा आणि अरबाज खान होय. अरबाज खान हा सलीम खान या प्रसिद्ध पटकथा लेखकांचा मुलगा असून बॉलिवूडचा दबंग खान सलमान यांचा लहान भाऊ आहे.
अरबाजने स्वतः काही चित्रपटांमध्ये अभिनय सुद्धा केला आहे मात्र सध्या तो आपल्या प्रोडक्शन हाऊस चे काम सांभाळत आहे.मलायका आणि अरबाज यांनी प्रेम विवाह केला होता व त्यानंतर अतिशय सुखासमाधानाने त्यांचा संसार चालू होता. त्यांना विवाहानंतर दोन मुले सुद्धा झाली. मलायका विवाहानंतरही काही अल्बममध्ये दिसून आली व अनेक प्रसिद्ध फॅशन शो साठी माँडलिंगसुद्वा करते.
मलायकाची मुख्य ओळख ही तिने केलेल्या आइटम सॉन्ग मुळे झाली आहे. मलायकाला विवाहानंतरही तिला आवडेल ते काम करण्याची मुभा होती. मात्र अचानक त्यांच्या सुखी संसारामध्ये एक वादळ निर्माण झाले मलायका आपल्या लहान नणंदेचा म्हणजेच अर्पिताचा प्रियकर अर्जुन कपूरकडे आकृष्ट झाली व त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले.

अर्जुन कपूर हा बोनी कपूर यांचा मुलगा असून आज घडीचा प्रसिद्ध अभिनेता आहे.अर्जुन कपूरच्या मलायकाच्या आयुष्यात येण्यामुळे अरबाज व तिच्यामध्ये दुरावा वाढला व त्याची परिणीती या दोघांचा घटस्फोट घेण्यामध्ये झाली. अरबाज पासून वेगळे झाल्यानंतर मलायका आपल्या दोन्ही मुलांचे पालनपोषण एकटीने करत आहे व लवकरच अर्जुन कपूर सोबत विवाहबद्ध होणार आहे.

एकेकाळी खान घराण्याची लाडकी सून म्हणून प्रसिद्ध असलेली मलायका अरबाज पासून वेगळे होण्याचा निर्णय कसा घेऊ शकते असा प्रश्नही त्यांच्या चाहत्यांना पडला होता कारण ज्या अर्जुन कपूर साठी घटस्फोट घेतला तो अर्जुन तिच्यापेक्षा वयाने लहान आहे मात्र तरीसुद्धा मलायकावर त्याचे खूप प्रेम असून ते भविष्यात विवाह करण्याचा गांभीर्याने विचार करत आहेत.