जेल मध्येच केले ड्रग डीलरशी लग्न! अशी आहे ममता कुलकर्णीची वादातीत जीवनी!

जेल मध्येच केले ड्रग डीलरशी लग्न! अशी आहे ममता कुलकर्णीची वादातीत जीवनी!

जेल मध्येच केले ड्रग डीलरशी लग्न! अशी आहे ममता कुलकर्णीची वादातीत जीवनी!

१९९० च्या दशकांत, ममता हि एक नावाजलेली हिरोईन होती. तिचे रूप, अभिनय आणि सुडौल बांधा यामुळे ती कायमच लोकांच्या नजरेत भरायची. तिची मूळची वादात पडायची सवय, तिला कायम प्रकाशझोतात ठेवायला मदत करत होती. १९९० चा काळ असा होता जिथे घरेलू सिनेमे आणि त्याग करणारी अभिनेत्री अशी प्रतिमा लोकांना पटकन धावायची. ममताने अशा भूमिका तर केल्याचं परंतु, तिने काही असे निर्णय तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात घेतले कि, तिला खूप समस्यांना तोंड द्यावे लागले.

स्टारडस्टचे मॅगझीन त्याकाळी देखील लोक चवीने वाचत. त्या मॅगझिनच्या कव्हर फोटोसाठी तिला विचारण्यात आले. तिने ते फोटोशूट केले आणि तेही टॉपलेस. या कारणामुळे, अनेक निदर्शने तिच्या विरोधात केली गेली. मात्र, तिचा बोल्ड स्वभाव तिला अशाच गोष्टींकडे आकर्षित करत होता. ती तिच्या मनाला पटेल ते करत गेली. कोणाचीही पर्वा न करता ती आपली वाट शोधत राहिली. मात्र, योग्य दिशा मिळाली नाही तर वाट भरकटून जाते; आणि माणसाचे आयुष्य सुद्धा हे तिला उमगायला फार वेळ लागला.

राजकुमार संतोषी जेव्हा चायना गेट हा चित्रपट निर्माण करत होते. तेव्हा त्यांना ममता कुलकर्णीला त्यातून वगळायचे होते. तिला जेव्हा हे कळाले तेव्हा, तिच्या अंडरवर्ल्डशी असणाऱ्या संबंधातून राजकुमार संतोषी यांना धमकीचे फोन येतील अशी तिने सोय केली. नंतर तो चित्रपट आपटला आणि तेव्हाही तिने त्यांच्यावर ‘मी टू’ चा चार्ज लावला. एकदा कोर्टात हजर होताना तिने बुरखा परिधान केला आणि बुरख्याची अशी अवहेलना केली म्हणून मुस्लिम समाज तिच्या विरोधात आक्रमक झाला. तिने अनेक गोष्टी अशा केल्या ज्यातून तिची नाचक्की झाली. मात्र ती सतत बातम्यांमध्ये येत राहिली.

एक वेळ अशी आली होती कि, तिला माहित होतं कि तिचे करियर आता संपले आहे. मात्र, तरीही बातम्यात येण्याचा केविलवाणा प्रयत्न ती करत राहिली. अंडरवर्ल्ड ड्रग किंग विकी गोस्वामी याच्याशी तो जेलमध्ये असताना लग्न करून तर तिने काँट्रावर्सिची परिसीमाच गाठली होती. अभिनेत्री आपले करियर संपल्यावर, किंवा विशिष्ट वयानंतर एखाद्या सेटल्ड आणि श्रीमंत माणसाशी लग्न करतात. मात्र हिचे धोरण काही वेगळेच होते. त्याच्याशी जेव्हा हिने लग्न केले. तेव्हा तो २५ वर्ष जेलमध्ये बंदिस्त असणार आहे याची तिला कल्पना होती.

गेली १० वर्ष ती गायब आहे. कधीच कुठेच दिसत नाही. असा अंदाज बांधला जातो कि, केनियामध्ये तिला आणि तिच्या नवऱ्याला अटक झाली आहे. यात किती तथ्य आहे हे फक्त तिलाच माहित. मात्र, एक सरळ आणि साधं आयुष्य, मेहनतीने जिथे नाव कमावता आलं असतं असं करियर, हे सगळं सोडून हाताने पायावर धोंडा पडून घेणे म्हणजे काय असेल तर याचे उत्तम उदाहरण ममता कुलकर्णी!

Being Marathi

Related articles