‘हा’ विदेशी क्रिकेटर लवकरच करतोय ‘या’ भारतीय महिलेशी लग्न

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेलने नुकताच साखरपुडा केला आहे.आपली भारतीय वंशाची प्रेयसी विनी रमन हिच्या सोबत नुकताच ग्लेनने वाड.निश्चय केला आहे व तशी अधिकृत घोषणाही त्यांनी आपल्या सोशल मीडियावरील अकाऊंट द्वारे आपल्या चाहत्यांसाठी केली आहे. विनी आणि ग्लेन हे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.
विनीनेसुद्धा आपल्या इन्स्टा ग्राम अकाऊंट द्वारे ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. ग्लेन मॅक्सवेल ऑस्ट्रेलियाचा एक अष्टपैलू खेळाडू असून सध्या होणाऱ्या दक्षिण आफ्रिका मधील सामन्यांसाठी त्याची ऑस्ट्रेलिया संघामध्ये निवड झाली होती मात्र फिटनेस समस्यांमुळे त्याने या सामन्यांमधून माघार घेतली.
आँस्ट्रेलियन क्रिकेट टीम दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघ यांच्यामध्ये t20 इंटरनॅशनल सिरीजचे सामने खेळले जाणार होते व त्यानंतर तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले जाणार आहेत.ग्लेनने विनीसोबत आपला फोटो शेअर करून त्याच्यामध्ये अंगठी चे चित्र पोस्ट केले आहे.तर माझ्या आवडत्या व्यक्तीने मागच्याच आठवड्यात मला विवाहासाठी विचारले व या प्रस्तावाला मी लगेच होकार दिला असे विनीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ग्लेनने काही काळ ब्रेक घेतला होता व त्याला कारण देताना त्याने आपल्याला मानसिक स्वास्थ्याच्या काही समस्या असल्यामुळे हा ब्रेक घेणे नितांत गरजेचे असल्याचे त्याने म्हटले आहे. या प्ब्रेकऩतर ग्लेनने पुन्हा दमदार कमबॅक केले व सध्या त्याचा फॉर्म अतिशय जोरात आहे या काळात मानसिक स्वास्थ्याशी निगडित समस्यांशी सामना करताना विनीने आपल्याला खूप साथ दिल्याचे ग्लेनने सांगितले.
विनीऑस्ट्रेलिया मध्ये काम करते व ती पेशाने फार्मासिस्ट आहे.विनी ही मूळची भारतीय वंशाची असली तरीही तिचा जन्म हा मेलबर्न मध्ये झाला आहे.ग्लेन आणि विनी यांची पहिली भेट 2013 साली झाली व सर्वात आधी ग्लेनने विनीला प्रपोज केले होते.ग्लेन आणि विनी यांचा साखरपुड भारतीय पद्धतीने झाला व यावेळी त्याचे कुटुंबीय सुद्धा भारतीय पेहरावात दिसले.

नुकत्याच काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया अकाउंटवर विनीला ग्लेनसारख्या डिप्रेशनने ग्रासलेल्या गोऱ्या वंशाच्या पुरुषाला डेट न करण्याचा सल्ला ट्रॉलर्स ने दिला होता. या वेळी या ट्रॉलर्सना अगदी खडे बोल सुनावत तिने ग्लेनवरील वंशभेद आणि मानसिक आरोग्यविषयक समस्यांच्या पलीकडे जाणारे प्रेम दाखवून दिले.