Celebrities Entertainment

‘या’ सुपरस्टार च्या सुनेच्या व्हायरल फोटोने चाहत्यांना केले घायाळ, दिसते खूपच हॉट – फोटो पहा

Sharing is caring!

बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये आपल्या आईवडिलांचा अभिनयाचा वारसा पुढे चालवणारे अभिनेते आणि अभिनेत्री नेहमीच दिसून येतात मात्र बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये सासू सासरे यांच्या अभिनयाचा वारसा सुनांनी पुढे चालवण्याची उदाहरणे सुद्धा कमी नाहीत. अमिताभ बच्चन जया बच्चन यांची सून ऐश्वर्या राय  किंवा चोप्रा घराण्याची सून राणी मुखर्जी या अतिशय यशस्वीपणे लग्नानंतरही आपली अभिनयाची कारकीर्द पुढे नेत आहेत.

या  उदाहरणांमध्ये अजून एक अभिनेत्री जी एका ज्येष्ठ अभिनेत्याची सून असून सध्या सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय होताना दिसून येत आहे. ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची सून मदालसा ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील एक लोकप्रिय अभिनेत्री असून तेलगू चित्रपटांमध्ये सुद्धा एक यशस्वी अभिनेत्री म्हणून गणली जाते.

मदालसा ही आपल्या अभिनयासोबतच आपल्या सौंदर्या साठी सुद्धा खूपच प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर मदालसा खूप सक्रिय असून तिच्या वेगवेगळ्या अदांमधील फोटोज ला चाहते खूप पसंत करतात. सध्या सोशल मीडियावर मदालसाचे अपलोड केलेला स्विमिंग सुट मधील एक फोटो चाहत्यांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहे.

या फोटोमध्ये मदालसा ही कमालीची सुंदर आणि कमनीय दिसत आहे .मदालसा च्या फोटो सोबतच या फोटोला दिलेले कँप्शन सुद्धा चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. सध्या टेलिव्हिजनवरील गाजत असलेल्या अनुपमा या  मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत दिसून येत आहे. ही भूमिका आणि पर्यायाने मदालसा प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली आहे.

मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा मिमोह चक्रवर्ती याची मदालसा पत्नी आहे.सासर प्रमाणेच माहेरी सुद्धा मदालसा हिला अभिनयाचा वारसा हा उपजतच मिळाला आहे.मदालसाची आई आई शीला शर्मा या अभिनेत्री असून तिचे वडील सुभाष शर्मा हे दिग्दर्शक आहेत.मदालसा हिला अभिनयाची आवड अगदी सुरुवातीपासूनच होती व तिने आपल्या अभिनयाची सुरुवात तेलुगू चित्रपट फिटिंग याद्वारे केली. आजही ती तेलगू चित्रपटांमध्ये विविध चित्रपटांमध्ये काम करताना दिसून येते.