‘पिरँमिड’समोर हॉट फोटोशूट करणं तिला पडले चांगलेच महागात, फोटो व्हायरल झाल्यानंतर…

व्यक्ती स्वातंत्र्य व कलाक्षेत्रातील अभिव्यक्तिस्वातंत्र्य याबद्दल अनेकदा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बाजू घेताना अनेकजण दिसून येतात. अभिव्यक्तिस्वातंत्र्या द्वारे व्यक्तीला आपल्या कलेद्वारे हवे तसे मोकळेपणाने व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य दिले जाते.मात्र स्वातंत्र्य आणि स्वैराचार यांच्यामध्ये जी अंधुकशी रेषा आहे ती ओलांडून कलेचे प्रदर्शन करणे हे समाजासाठी घातक आहे असा सुद्धा एक प्रवाह प्रचलित आहे.
नुकतेच भारतामध्ये देखील न ग्ना व स्थे मध्ये फोटोशूट करून समाजातील भावना भडकावण्याच्या आरोपाखाली माँडेल पूनम पांडे व तिच्या पतीला अटक करण्यात आली होती. या प्रकारचे कायदे हे जगभरामध्ये अनेक ठिकाणी अस्तित्वात आहेत. नुकतेच इस्रायलची राजधानी मिस्त्र येथे पिरँमिड च्या समोर सलमा अल शमी या जगप्रसिद्ध फॅशन मॉडेल ने प्राचीन काळी इजिप्त मध्ये घातल्या जाणाऱ्या पेहरावा मध्ये अ र्ध न ग्न अवस्थेत फोटोशूट केले.
हे फोटोशूट सामाजिक आणि धार्मिक भावना दुखावल्या जाणा -या प्रकारात मोडते असा आरोप ठेवत हे फोटोशूट करणाऱ्या छायाचित्रकाराला अटक करण्यात आली आहे .अशी अफवा सुद्धा पसरली होती की हे फोटोशूट करणाऱ्या मॉडेलला सुद्धा अटक करण्यात आली आहे मात्र या बातमीचे खंडन करण्यात आले. प्राचीनकाळी इजिप्तध्ये घातल्या जाणाऱ्या पेहरावाला जो खूपच तोकडा असे असा पेहराव करून पिरॅमिडच्या समोर फोटोशूट केलेल्या या मॉडेलने पुरातत्व खात्याच्या विशेष महत्त्व असलेल्या स्थळांच्या ठिकाणी असलेल्या नियमांचे उल्लंघन करून हे फोटोशूट केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
त्यामध्ये प्रसिद्ध मॉडेल सलमा अल.शमी हिने ही छायाचित्रे आपल्या इंस्टाग्राम वरील अकाउंट वर शेअर केली होती. या पुरातत्व खात्याने ऐतिहासिक वारसा दिलेल्या स्थळावर अर्धनग्न अवस्थेमध्ये छायाचित्रे काढून या वास्तूच्या पावित्र्याला धक्का दिला.असा ठपका या मॉडेलवर ठेवण्यात आला आहे.

या छायाचित्रकारावर न्यायालयामध्ये कारवाई सुरू असून त्याला खूप कडक शिक्षा केली जाऊ शकते असे सांगितले जाते. या माँडेल ने शेअर केलेल्या छायाचित्रांवर ट्रोलर्सनी खूपच तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत.एका ट्रोलरने हे अशा प्रकारचे अश्लील छायाचित्र सामान्य बाब आहे का याची विचारणा केली आहे. या प्रकरणाला गांभीर्याने घेत प्रशासनाने या ठिकाणी फोटोशूट करण्याची परवानगी दिलेल्या कर्मचाऱ्यांचा शोध घेणे सुरू केले आहे.

याअगोदर 2018 साली एका जोडप्याने ग्रेट पिरँमिड समोर छायाचित्रे काढली होती व ती सोशल मीडियावर शेअरसुद्धा केली होती. या प्रकरणानंतर संपूर्ण देशभरामध्ये खूपच गदारोळ माजला होता.या प्रकरणाची गंभीर दखल घेत न्यायालयाने या प्रकरणी हे जोडपे व एक उंट चालक आणि हे छायाचित्र काढण्यास मदत करणारी एक तरुण महिला गाईड यांनासुद्धा शिक्षा सुनावली होती.
