भूमिकेच्या बदल्यात दिग्दर्शक करायचे तसली मागणी, या प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितले बॉलिवूडचे काळे सत्य

सुशांतसिंह राजपूतच्या आ त्म ह त्ये नंतर बॉलीवूड मध्ये कोणताही गॉडफादर नसताना एन्ट्री करणाऱ्या ना्ँनफिल्मी बँकग्राउंडच्या अभिनेते व अभिनेत्रींनी समोर येऊन आपल्यावर झालेल्या अत्याचारांबद्दल उघडपणे बोलण्यास सुरुवात केली आहे.
नुकत्याच अनुराग कश्यप या आघाडीच्या दिग्दर्शकावर पायल घोष या अभिनेत्रीने लैं गि क शोषणाचा आरोप केला व या निमित्ताने बऱ्याचशा अभिनेत्रींनी कशाप्रकारे चित्रपटांमध्ये छोट्यातील छोटी भूमिका मिळवण्यासाठी निर्माता-दिग्दर्शकां सोबत जबरदस्तीने त्या मागण्या पूर्ण कराव्या लागतात अन्यथा चित्रपटांमध्ये भूमिका मिळत नाहीत.
या मागण्या काही अभिनेत्री मूकपणे स्वीकारतात तर काही आपल्या मूल्य आणि तत्त्वांवर ठाम राहून वेळ पडली तर चित्रपटसृष्टीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतात . अशीच एक अभिनेत्री नर्गिस फाखरी हिने आपल्याला चित्रपटांमध्ये भूमिका मिळवण्यासाठी कशाप्रकारे निर्माता आणि दिग्दर्शक लैं गि क शोषण करण्याचा प्रयत्न करत असत हे उघडपणे सांगितले आहे.

नर्गीस फाखरी ही काही निवडक चित्रपटांमध्ये झळकली असून यापैकी तिचा पदार्पणातील रॉकस्टार हा चित्रपट समीक्षकांची प्रशंसा मिळवून गेला होता .यानंतर नर्गिस ला आपल्या अभिनयाच्या जोरावर नव्हे तर निर्माता आणि दिग्दर्शकांसोबत लैं गि क सं बं ध प्रस्थापित करण्यासाठी गळ घातली जात असे व याच्या बदल्यात तिला भूमिका देण्याचे आमिष दाखवले जात असे मात्र या आमिषांना नर्गिस कधीच बळी पडली नाही व त्यामुळे तिला आँडिशन मध्ये देऊ केलेल्या भूमिका नंतर काढून घेऊन दुसर्या कुणाला तरी दिल्या जात असत असे तिने सांगितले आहे.

मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहण्याचा आपल्याला कोणताही पश्चाताप होत नाही तर आपल्या आईने जी शिकवण दिली होती ती नैतिकता आपण कायमच पाळली याचा आपल्याला अभिमान आहे असे ती सांगते. नर्गिस फाखरी वा अन्य काही अभिनेत्रींच्या समोर येऊन आपल्यावर झालेल्या अत्याचारांबद्दल च्या वाच्यते मुळे बॉलीवूडची अजून एक काळी बाजू समोर आली आहे.