कधी काळी लाँटरीची तिकीटे विकणारी ‘ही’ अभिनेत्री आज आहे नंबर वन डान्सर, आता आहे ‘कोट्यावधींची’ मालकीण….

भारतीय टेलिव्हिजन क्षेत्रा मध्ये डान्सशी निगडित रियालिटी शो लोकप्रिय होतात. या रियालिटी शोमधून अनेक टॅलेंट समोरही आले आहे .सध्या अशाच एका डान्स रिॲलिटी शोमधील जज नोरा फतेही तिच्या टेरेन्स या तिच्या सह काम करणाऱ्या परीक्षक सोबतच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खूपच चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये टेरेंस नोराहला आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श करताना दिसत आहे. यामुळे प्रेक्षकांनी टेरेसला चांगलेच फैलावर घेतले असून नोराहला समर्थन दिले आहे.
नोरा फतेही चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नसून याअगोदर सुद्धा नोरा फतेही हे नाव नृत्य आणि ग्लॅमरच्या दुनिया मध्ये अनेकदा चर्चेत आले आहे. बाहुबली, दीलबर दीलबर या सह अनेक आइटम सॉन्ग वर आपल्या दिलखेचक अदांन न्रुत्य केलेल्या सौंदर्यवती नोराचे अनेक चाहते आहेत व आजघडीला बॉलिवूडमधील नंबर एकची आयटम डान्सर म्हणून नोरा ला पसंती दिली जाते .
नोराने बिग बॉस 13 च्या सिझनमध्ये वाइल्ड कार्डद्वारे एन्ट्री घेऊन या घरामध्ये सुद्धा आपले अस्तित्व दाखवून दिले होते व प्रेक्षकांनाही त्याची दखल घ्यावी लागली होती. आज नोरा फतेही कोणतेही पाठबळ नसताना स्वतंत्रपणे बॉलीवूड मध्ये आपले स्थान निर्माण करत आहे. मात्र आजपर्यंतचा तिचा प्रवास आणि संघर्ष सहजसोपा नव्हता तर अगदी लहान वयातच कुटुंबाची कमावती व्यक्ती म्हणून तिला पडेल ते काम करावे लागले होते व ते काम करताना केवळ आपल्या कुटुंबाच्या खाण्याचा राहण्यासाठीचा प्रश्न कसा सोडवता येईल याचा आपण विचार करत असू असे खुद्द नोराने एका मुलाखतीत सांगितले.
या कार्यक्रमामध्ये नोराने आपल्या कुटुंबावर खूप मोठे आर्थिक संकट आले होते ज्यामुळे खाण्यापिण्याची भ्रांत निर्माण झाली होती. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पैसे कमावण्यात शिवाय दुसरा पर्यायच नव्हता असे सांगितले.त्यावेळी नोराचे शिक्षण चालू होते .तिचे वय सोळा वर्षे होते व आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तिच्या शाळे जवळ असलेल्या एका मॉलमध्ये ती सेल्सगर्ल म्हणून काम करू लागली होती.

शाळा सुटल्यावर ती सेल्स गर्लचे काम करत असे व या ठिकाणी तिला एक हजार रुपये इतके वेतन दरमहा मिळत असे. अधिकाधिक पैसे कसे कमवता येतील यासाठी नोरा मिळेल ते काम करत असे. यासाठी पुरुषांसाठी च्या वस्त्र दालना मध्ये देखील तिने काही दिवस काम केले. त्यानंतर बार आणि शॉप मध्ये वेटरचे काम सुद्धा नोराने काही काळ केले होते.

एका टेलिमार्केटिंग कंपनीमध्ये नोराने आपले नशिबात आजमावले होते तसेच काही काळ अक्षरशःलॉटरीचे तिकीट विकण्याचे काम सुद्धा आपण केले होते असे तिने सांगितले. हे सर्व करण्यामागे आपल्या घरातील एक जबाबदार व्यक्ती म्हणून पैसे कमावणे हेच केवळ एक उद्दिष्ट होते असे ती सांगते. मॅकडोनाल्ड्स मध्ये सुद्धा कमिशन तत्वावर पैसे घेऊन काम करत असे.

नृत्य आणि अभिनयाची आवड नोराला खूप अगोदरपासूनच होती. यासाठी बॉलीवूड हा अतिशय चांगला पर्याय होता मात्र बॉलिवूडमध्ये तिच्या ओळखी नव्हत्या.अशा मध्ये एका जाहिरातींमध्ये काम करण्याची संधी मिळाली व तिथूनच तिने निर्माता व दिग्दर्शक यांचे लक्ष वेधून घेतले .नुकत्याच प्रदर्शित झालेल्या स्ट्रीट डान्सर 3d या चित्रपटांमध्येही नोराने काम केले आहे.