शेतकरी आंदोलनाला प्रियकांचा पाठिंबा .. नेटेकरी मात्र चिडले ओवर अॅक्टिंगचे पैसे कापा

सध्या दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला खूप वेगळे – वेगळे वळण लागत आहे. अगदी गल्ली पासून ते दिल्लीपर्यत या आंदोलनाची चर्चा सुरू आहे. लोक चांगला प्रतिसाद देखील देत आहे. या सर्व गोंधळात आपले बॉलीवुड स्टार्स देखील कसे मागे राहतील. बॉलीवूडमध्ये देखील या मुद्यावरून चांगलेच वातावरण तापले आहे. काही कलाकार या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत तर काही मात्र या कडाडून विरोध करत आहे. आता हेच पहा ना, अभनेत्री प्रियंका चोपडा हिने देखील शेतकऱ्यांना पाठिंबा जाहीर केला. तिने सोशल माध्यमांवर एक विडियो पोस्ट करून त्या फोटोला अशा काही ओळी लिहिल्या. त्या ओळी अशा आहेत की.
फूड आर्मी असं लिहिलं आहे. या फोटोवरून असे समजते की प्रियंका शेतकरी आंदोलनाला सपोर्ट करत आहे. म्हणजे तिचा या आंदोलनाला पाठिंबा आहे. तिने हा फोटो पोस्ट केल्या नंतर मात्र अनेक नेटेकरी मात्र तिच्यावर चांगलेच संतापले आहेत. कारण प्रियंका हिने मागच्या वर्षी अमेरिकन गायक निक जॉनस ह्यांच्याशी विवाह केला आहे आणि ती अमेरिकेत असते. तिने तिथे राहून या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे, ज्या गोष्टीचे आपल्याला ज्ञान नाही त्या बद्दल आपण बोलू नये असे नेटकरी लोकांचे म्हणणे आहे.

त्यांच्या मते प्रियंका येथे राहत नाही , तिला या कायद्याविषयी काही माहीत नसून ती प्रतिक्रिया देत आहे. जी गोष्ट आपल्याला माहीत नाही त्या विषयी आपण बोलू नये असे म्हणणे आहे. प्रियंकाला ट्रॉल करणारे अनेक मीम्स सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतं आहेत. पंजाबी गायक दिलजित आणि कंगणा यांच्यामध्ये देखील बरेच वाद झाले होते. आता प्रियंका देखील या वादात सहभागी झाली आहे.