अखेर राखी सावंतचा पती आला जगा समोर संगितले कारण का लपविली होती स्वताची ओळख

आयटम गर्ल राखी सावंत नेहमी चर्चेत असते. कारण राखी नेहमीच काही स्पोटक स्टंटमेंट करत असते. सध्या राखी सावंत बिग बॉस 14 मध्ये सहभागी झाली असून ती रोज नवनवीन काही गोष्टी सांगत आहे. राखिने मागच्या एका भागात संगितले होते की तिचे लग्न झाले असून तिचा पती हा परदेशात राहतो आणि काही कारणास्तव तो सर्वान समोर येत नाही.
या गोष्टी नंतर राखीवर सर्व बाजूनी टीका झाली. राखी खोट बोलत आहे आणि हा तिचा पब्लिसिटी स्टंट आहे. असे देखील अनेकांनी म्हटले होते. परंतु बिग बॉस मधील एक स्पर्धक निकी तांबोळी याने राखीवर आणि तिच्या लग्नावर अनेक प्रश्न उभे केले त्या नंतर मात्र राखीचा पती रितेश हा जगा समोर आला आहे. त्याने एका वर्तमान पत्राला स्वता मुलाखत दिली आहे. तसेच आता पर्यत स्वताला आणि राखीच्या लग्नाला का लपविले हे देखील संगितले आहे. रितेश युके मधील एक बिजनेस मॅन आहे.
राखी आणि माझे लग्न लपविण्यामागे एक महत्वाचे कारण म्हणजे माझे बाजारपेठेत अनेक शेअर्स आहेत. आणि जर माझी आणि राखीच्या लग्नाची बातमी समोर आली तर त्यांचे भाव उतरतील आणि बिजनेसमध्ये माझा मोठा तोटा होईल. त्यामुळे मी माझे आणि राखीचे नाते लपविले. राखी खरोखरच चांगली मुलगी आहे. ती मला उत्तमपणे समजून घेते. आता कितीही नुकसान झाले तरी माझे आणि राखीचे नाते जास्त काळ लपविणार नाही. मी निकीलवर गुन्हा देखील दाखल करू शकतो पण मी तसं काही करणार नाही कारण बिग बॉस हा एक खेळ आहे. त्यामुळे मी गोष्ट खेळकर वृत्तीने घेणार आहे. राखीचे माझ्यावर अनेक उपकार आहेत.