राणू मंडलचे नशीब पुन्हा फळफळले , रामायणातील सिते सोबत करणार काम

लॉक डाऊन पूर्वी एका पश्चिम बंगाल येथील एका रेल्वे स्टेशनवर लता मंगेशकर यांचे एक प्यार का नगमा हे गाणे गाणारी एक महिला अचानक रातोरात खूप प्रसिद्ध झाली होती. ही महिला दुसरी तिसरी कोणी नसून राणू मंडल ही आहे. राणाघाट रेल्वे स्टेशनवर राणू गान गात तिच्या या गाण्याचा विडिओ अचानक खूप व्हायरल झाला आणि राणूला अनेकांनी मुंबईला येण्यासाठी आमंत्रित केले. तिला अक्षरक्षा दुसऱ्या लता दिदी यांची उपमा देण्यात आली. राणू अखरे मुंबईत आली. तिला येथे कामे देखील मिळू लागली. सतत काहीना काही कारणांमुळे ती नेहमी चर्चेत असतं. परंतु अचानक करोंना महामारीमुळे संपूर्ण जगात एकच हाहाकार माजला. भारतात देखील त्यांचे परिणाम दिसू लागले.

शेवटी भारतात देखील लॉक डाऊन करावे लागले. लॉक डाऊन मध्ये सर्वांच्या हातचे काम गेले. राणू देखील बेरोजगार झाली. शेवटी राणूने तिच्या मुळगावी म्हणजे राणा घाट येथे परतण्याचा निर्णय घेतला. ती जमा केलेले थोडेफार काही पैसे घेऊन पुन्हा तिच्या मुळ गावी परतली. तब्बल सहा – सात महिन्यानंतर संपूर्ण जग सुरू झाले. सर्व व्यवसाय आणि कामे देखील सुरू झाली. राणूला देखील पुन्हा मुंबईवरुण बोलावंण आले. रामानंद सागर यांच्या प्रसिद्ध रामायणातील सीतेचा रोल करणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया एक नवीन चित्रपट करत आहेत आणि या चित्रपटात त्या राणू मंडल यांना गाणं गाण्याची संधी देणार आहेत.
यांची माहिती देताना दीपिका यांनी त्यांच्या सोशल मिडियाच्या अकाऊंटवर एक विडिओ शेयर केला आहे. या विडिओमध्ये राणू तिच्या फॅन्सला एक आनंदाची बातमी डेट आहे, ती सांगत आहे की मी लवकरच एका चित्रपटातून गाणं गाणार आहे. तुम्ही सर्व पुन्हा मला तेच प्रेम द्याल ही अपेक्षा. अभिनेता हिमेश रेशमिया याने देखील राणू सोबत एक गाणे गायले होते.या बरोबरच एका रीयालिटि शो मध्ये देखील राणू गेस्ट म्हणून चमकली होती. राणू अनेक कारणांसाठी नेहमीच चर्चेत असते. आता हे गाणे देखील प्रेक्षकांना किती आवडते आहे हे पाहणे रंजक ठरणार आहे.